महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय युवा महिला संघाचा एकतर्फी विजय

06:44 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

मलेशियाचा 10 गड्यांनी पराभव, हॅट्ट्रिकसह 5 बळी टिपणारी वैष्णवी शर्मा ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

Advertisement

आयसीसीच्या येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय युवा महिला संघाने केवळ 17 चेंडूत मलेशियाचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपली विजय घोडदौड कायम राखली आहे. भारतीय संघातील गोलंदाज वैष्णवी शर्माला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. वैष्णवीने 5 धावांत 5 गडी बाद केले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मलेशियाचा डाव 14.3 षटकात 31 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 2.5 षटकात बिनबाद 32 धावा जमवित हा सामना 103 चेंडू बाकी ठेवून 10 गड्यांनी एकतर्फी जिंकला.

मलेशियाच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तसेच त्यांच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. सलामीच्या हेरुनने 1 चौकारांचा 5, रेझालीने 5 धावा केल्या. मात्र मलेशियाला 11 अवांतर धावा मिळाल्या. भारताची फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने आपल्या चार षटकामध्ये केवळ 5 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले. आयुषी शुक्लाने 8 धावांत 3 तर जोशीताने 5 धावांत 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची सलामीची जोडी जीत्रिशा आणि कमलिनी यांनी  17 चेंडूत 32 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. त्रिशाने 12 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 27 तर कमलिनीने 5 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 4 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक: मलेशिया 14.3 षटकात सर्वबाद 31 (हैरुन 5, रझाली 5, अवांतर 11, वैष्णवी शर्मा 5-5, शुक्ला 3-8, जोशिता 1-5), भारत 2.5 षटकात बिनबाद 32 (जी. त्रिशा नाबाद 27, कमलिनी नाबाद 4, अवांतर 1)

Advertisement