कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठळकवाडी लवडेल शालेय संघाचे एकतर्फी विजय

06:02 AM Dec 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दासाप्पा शानभाग क्रिकेट स्पर्धा

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

युनियन जिमखाना आयोजित 34 व्या शानभाग चषक 16 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेलया सामन्यापुन ठळकवाडी हायस्कूल व लव्हडेल शालेय संघाने एकतर्फी विजय मिळवले. निश्चल हिरेमठचे दमदार शतक हे आजच्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्या ठरले. नागेश्वर बेनके, निश्चल हिरेमठ सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

जिमखाना मैदानावर पहिला सामन्यात ठळकवाडी शालेय संघाने मराठा मंडळ हायस्कूलचा 8 गड्यांनी पराभव केला. मराठा मंडळ शालेय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 बाद 90 धावा केल्या. त्यात सर्वज्ञ पाटीलने 6 चौकारांसह 49, नमन बडवाण्णाचेने 10 धावा केल्या. ठळकवाडी तर्फे नागेश्वर बेनकेने 3, वेदांत पोटे व ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरदाखल खेळतानला ठळकवाडी शालेय संघाने 14.5 षटकात 2 गडी बाद 92 धावा जमवत हा सामना 8 गड्यांनी जिंकला. प्रज्योत उघाडेने 4 चौकारांसह 42, श्रेयस बसवाडकरने 3 चौकारांसह 28 धावा केला.

दुसऱ्या सामन्यात लवडेल स्कूल संघाने नोबल शालेय संघाचा तब्बल 224 धावानी पराभव केला.  लव्हडेल शालेय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 4 गडी बाद 274 धावा केल्या. त्यात  सलामीवीर निश्चल हिरेमठने 81 चेंडूत नाबाद 22 चौकारांसह 144 धावांची शतकी खेळी साकारली सुरजने 7 चौकारांसह 44, अजय लमानेने 3 चौकारांसह 20, अंश वेर्णेकरने 17 धावा केल्या. नोबल तर्फे जियान मोमीन, वेदांत शिंदे, ओमकार कुंभार, आयान वाटे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.  प्रत्युत्तरदाखल खेळतानला नोबल शालेय संघाचा डाव 16.2 षटकात 50 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही, लव्हडेल तर्फे अजय लमानीने 5 धावात 4, वेद नवने व आयुष सायण्णावर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#Sport
Next Article