महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास शिक्षा
सावंतवाडी -
महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणाचा गुन्हा न्यायालयासमोर साबित झाल्याने सावंतवाडी न्यायालयाने आरोपी बाळकृष्ण प्रकाश चव्हाण (35) रा माडखोल ता. सावंतवाडी याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. विनयभंगाच्या भा. द. वि कलम 509 नुसार दोषी ठरवत तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसाची साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक अभियोक्ता धनश्री गोवेकर व तत्कालीन तपासी अधिकारी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राजलक्ष्मी राणे यांनी सक्षम बाजू मांडली. हा गुन्हा डिसेंबर 2021 रोजी घडला होता. महिला रस्त्यावरून चालत येत असताना आरोपी बाळकृष्ण चव्हाण यांनी तिला पाहून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे कृत्य करून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बाळकृष्ण चव्हाण रा.माडखोल विरोधात भादवि कलम 354 (ड) व ५०९ कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. सदरच्या गुन्ह्याच खटल्याची सुनावणी न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता धनश्री गोवेकर यांनी न्यायालयात नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षीत असलेला पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद व पुरावे न्यायालयाने ग्राह्य म्हणून न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीम. कुंभार यांच्या न्यायालयाने आरोपी बाळकृष्ण प्रकाश चव्हाण याला कलम 509 नुसार दोषी ठरवून तीन महिने सक्त मजूरची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसाची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.