महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक लाख लोक करणार भगवद्गीता पठण

06:27 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकात्यात 24 डिसेंबरला आयोजन, पंतप्रधानांचीही उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पुढील महिन्यात कोलकाता येथे एक लाख लोकांच्या उपस्थितीत भगवद्गीता पठण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी दिली. या कार्यक्रमात अनेक धार्मिक संघटनांचे लोक एकत्र येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात आल्याचेही स्पष्ट केले.

24 डिसेंबर रोजी शहराच्या मध्यभागी असलेल्या ब्रिगेड परेड मैदानावर ‘एक लाख गीता पाठ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मजुमदार यांनी सांगितले. आम्ही पंतप्रधान मोदींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी आमचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्या दिवशी एक लाख लोक एकत्र भगवद्गीतेचे पठण करतील. हा एक गैर-राजकीय कार्यक्रम असेल. या कार्यक्रमाचा भाजपशी काहीही संबंध नाही, असेही ते पुढे म्हणाले. तथापि, सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा कार्यक्रम धोरणात्मकरित्या आयोजित केला जात असल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असताना भाजप नेते वारंवार राज्याला भेट देतील हे अगदी स्वाभाविक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आपण हा ट्रेंड पाहिला आहे. मात्र, यातून कोणताही फायदा होणार नाही, अशी कोपरखळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी मारली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article