फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, सात जखमी
जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरु
कोल्हापूर - महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनलगत सुरु असलेल्या अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा स्लॅब कोसळून सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला. नवनाथ आण्णाप्पा कागलकर (वय ३८, रा. शाहूनगर, राजारामपुरी) असे त्याचे नाव आहे. तर दत्तात्रय सुभाष शेंबडे (वय ३७), अक्षय पिराजी लाड (वय ३०, रा. गंगाई लॉन), वैभव राजू चौगुले, सुमन सदाशिव वाघमारे, जयश्री सुभाष शेंबडे (वय ५७), वनिता बापू गायकवाड (सर्व. रा. सुधाकर जोशीनगर) आदी स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, महापालिकेचे फुलेवाडी येथे फायर स्टेशन आहे. या फायर स्टेशनलगतच अग्निशमनच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. रेणुका कन्स्ट्रक्शनच्यावतीने गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरु आहे.
मंगळवारी सायंकाळी वाजल्यापासून येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. चार सेंट्रिंग कामगार व चार मजूर असे एकूण आठ कर्मचारी स्लॅब टाकण्यात व्यस्त होते. अचानक स्लॅबला भेगा जाऊ लागल्याने दोघा कर्मचाऱ्यांनी स्लॅबवरुन खाली उड्या मारल्या. तर अन्य सहाजण ढिगाऱ्याखाली अडकले. यामधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सात सीपीआरमध्ये दाखल केले.
स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेचा संपूर्ण अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरु केले. तसेच दोन जेसीबी, चार अग्निशमन गाड्या, चार रुग्णवाहिका, सीपीआरचे वैद्यकीय पथकही पाठोपाठ दाखल झाले. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या कामगारांना बाहेर काढत तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
वाहनांच्या उजेडात बचावकार्य स्लॅब कोसळल्यानंतर येथे पूर्णतः अंधार झाला. अंधारामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी वाहनांच्या लाईट पाडत प्रकाश पाडला. यामध्ये बचावकार्य दहा मिनिटात दोषांना काढले बाहेर
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान व स्थानिक तरुणांनी बचावकार्य सुरु केले. बॅटरीच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांचा शोध सुरु झाला. यामध्ये त्यांना यश आले. पहिल्या दहा मिनिटातच ढिगाऱ्याखाली सापडलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले.
बघ्यांची गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार
फुलेवाडी फायर स्टेशन येथील इमारतीचा स्लॅब कोसळल्याचे वृत्त परिसरात वेगाने पसरले. यामुळे याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली. या गर्दीमुळे बचावकार्यामध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगविली.
स्थानिकांचे बचावकार्य
स्लॅब कोसळल्यानंतर स्थानिक तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये विजय वरुटे, अवधूत, महेश बांदेकर यांच्यासह तुळजाभवानी मंदिर, साई ग्रुप, योगेश नाईक, रोहित आळवेकर, यांच्यासह परिसरातील स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले. अग्निशमन दलाच्या इमारतीमधील कर्मचारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
काँक्रिट, सळ्या आणि सेंट्रिंगचा मलबा
स्लॅब कोसळल्यानंतर घटनास्थळी काँक्रिटचा पूर्ण वर पडला होता. तसेच स्लॅबमध्ये जोडलेल्या सळ्या, त्याखाली सेंटिंगच्या प्लेट, बांबू ३० फुटावरुन स्लॅब कोसळलाअग्निशमन दलाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले आहे.
इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरु होते. सुमारे २५ ते ३० फुटावर हा स्लॅब जोडण्यात आला होता. अग्निशमन दलाचे वाहन लावण्यासाठी इमारतीच्या पुढील भागाच्या स्लें बची उंची वाढविण्यात आली होती. सुमारे ३० फुटावरुन स्लॅ व कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. यामुळे नागरिक गोळा झाले.आणि लाकडी फळ्या पडल्या होत्या. दोन जेसीबीच्या सहाय्याने हा मलबा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
स्लॅबच्या कामाचा अहवाल सकाळी नऊ वाजेपर्यंत द्या: प्रशासक के. मंजूलक्ष्मी
स्लॅबच्या कामाचा संपूर्ण चौकशी अहवाल बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. कामाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती तत्काळ नेमली. यामध्ये अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर व एक स्ट्रक्चरल ऑडिटर घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
तसेच या कामामध्ये निष्काळजीपणा झाला का, संबंधित ठेकेदाराने केलेल्या बांधकामाचा दर्जा, बांधकामाची गुणवत्ता, स्लॅब टाकण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य होते की नव्हते या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी केली. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.