महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धारबांदोडा येथे दुचाकीच्या धडकेत एक ठार; 1 जखमी

12:30 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोंडा  : गोवा-बेळगांव महामार्गावर धारबांदोडयाहून दाभाळ जाणाऱ्या सर्कलजवळ दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वारही  गंभीर जखमी झाला. गोकुळदास बाबल गावकर (51, दावकोण-दाभाळ) असे मृताचे नाव आहे. शेख अब्दूल समीर (41, फातोर्डा) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची घटना सकाळच्या सुमारास घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गोकुळदास हा आपल्या प्लेजर जीए 09 एफ 3956 धारबांदोड्याहून सोसायटीचा रेशन कोटा घेऊन जात असताना हा अपघात घडला. धारबांदोड्याहून घरी जाण्यासाठी दाभाळ जन्क्शन पार करताना समोरून मोलेहून उसगांव दिशेने भरघाव वेगाने येणाऱ्या डुकाटी एमएच 02 ईजी 3333 दुचाकीने ठोकरल्याने तो रस्त्यावर फेकला गेला. गंभीर अवस्थेत त्याला पिळ्यो धारबांदोडा येथील सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत गोकुळदास हा अंत्यत शांत स्वभावाचा म्हणून या भागात परिचित होता. तो गवंडी काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article