For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सांखळीत कार, दुचाकी अपघातात एक ठार

06:12 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांखळीत कार  दुचाकी अपघातात  एक ठार

मयत मडकई येथील युवक,  दुचाकीला चारचाकीची मागाहून धडक

Advertisement

     डिचोली प्रतिनिधी     

गोकुळवाडी-सांखळी येथे दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. दुचाकीला चारचाकीची मागाहून धडक बसल्याने त्यावरील चालक रस्त्यावर पडला व चारचाकीखाली सापडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

ही घटना काल शनिवारी संध्या. 6.30 वा. च्या सुमारास घडली. मडकई-फोंडा येथील संदेश मधू नाईक (वय 35) हा युवक आपल्या मोटरसायकलने (जीए 05 ए 4883) सांखळीहून सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राच्या दिशेने जात असताना गोकुळवाडी-सांखळी येथे रम्बलर्सवर पोहोचला असता त्याला मागाहून जीए 04 ई 4769 या कारने धडक दिली.

Advertisement

या धडकेने संदेश नाईक हा युवक रस्त्यावर पडला. त्याला सदर कारने फरफटत काही अंतरावर नेल्यानंतर कारचे एक चाक त्याच्या अंगावर चढले व गाडी थांबली. यावेळी घटनास्थळी लोक जमा झाले. या लोकांनी गाडी उचलून चाकाखाली अडकलेल्या संदेश याला बाहेर काढले. लागलीच जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला.

रुग्णवाहिकेतून अपघातात जखमी झालेल्या संदेश याला सांखळी सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा पंचनामा हवालदार दयानंद गावस यांनी केला, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत आहे.

Advertisement
Tags :
×

.