महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

क्रेन व दुचाकी अपघातात एक ठार ! धावडवाडीजवळील घटना

03:58 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

जत प्रतिनिधी

विजापूर गुहागर महामार्गावर जत तालुक्यातील धावडवाडी बसस्थानकाजवळ क्रेन व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात धावडवाडी येथील तरुण किरण सुरेश सुतार (वय 28) हा जागीच मयत झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
नागजहून जतकडे भरधाव वेगाने येणारी क्रेन धावडवाडी जवळ आली असता बसस्थानक समोरच दुचाकीवर जाणारा किरण सुतार यांना क्रेनने पाठीमागून जोरात धडक दिल्याने डोक्यावर मार लागल्याने जागीच मयत झाला. अपघात घडल्यानंतर क्रेन चालक क्रेन सोडून तेथून पळून गेला. नातेवाईकांनी मयत किरणचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला.

Advertisement

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
धावडवाडी बसस्थानकाजवळ गेल्या महिन्यात बकरी ईदच्या दिवशी ट्रकने ठोकरल्याने मुंबई येथे बेस्ट कंपनीत कामाला असलेला शेख नामक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अगोदरही तीन चार अपघात या ठिकाणी घडले आहेत. वारंवार अपघात होत असल्याने वाहनांचा वेग कमी होण्यासाठी छोटे गतीरोधक बसवावेत अशी मागणी जनतेतून होत आहे. मात्र गतीरोधक बसविण्याच्या हालचाली कांही रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडून झाल्या नाहीत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पुन्हा हा अपघात होऊन किरण याचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा या घटनेची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Next Article