कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावहून मंगळूरला निघालेली आराम बस नाल्यात कोसळून एक ठार

12:40 PM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

18 प्रवासी जखमी : चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

Advertisement

कारवार : बेळगावहून यल्लापूरमार्गे मंगळूरकडे निघालेली खासगी आराम स्लीपर कोच बस प्रवाहीत नाल्यात कोसळून 18 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना रविवारी रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अंकोला तालुक्यातील हमरस्ता क्रमांक 63 वरील अगसूरन येथील हॉटेल जगदीशजवळ घडली. या अपघातात 18 पैकी 5 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले असून अन्य एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी मंगळूर आणि येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी आणि मयत प्रवाशाचे नाव समजू शकले नाही. या अपघाताबद्दल समजलेली अधिक अशी, केए 5 आयडी 2517 क्रमांकाची नवदुर्गा नावाची खासगी स्लीपर कोच बस रविवारी रात्री बेळगावहून यल्लापूर-अंकोला, भटकळमार्गे मंगळूरला निघाली होती.

Advertisement

अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अगसूर येथील हॉटेल जगदीशनजीकच्या नाल्याजवळ बसवरील नियंत्रण चुकले आणि नाल्याच्या कठड्याला ठोकर देऊन बस नाल्यात कोसळली. काहींच्या मते रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण चुकले आणि बस नाल्यात कोसळली. सुदैवाने नाला अधिक खोल नव्हता आणि नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. बसमधून लहान मुले, बँक कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, गुंतवणूक मार्केटींग एक्झिकुटीव्ह आणि महिला प्रवास करीत होत्या. अपघाताची माहिती मिळताच अंकोला पोलिसांनी घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. गंभीररित्या जखमी झालेल्यांना कारवार आणि मंगळूर येथील रुग्णालयात तर किरकोळरीत्या जखमी झालेल्यांना अंकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वृत्तपत्रांची वाहतूक करणाऱ्या चालकाची मोठी कामगिरी 

नाल्यात बस कोसळल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरून वृत्तपत्रांची वाहतूक करणाऱ्या सैयद झाकीर इनामदार नावाच्या चालकाने मोठी कामगिरी बजावल्याचे सांगण्यात आले. शिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकांनी मदत केल्याचे सांगण्यात आले. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article