For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार चाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

03:37 PM Dec 14, 2024 IST | Radhika Patil
चार चाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
One dead in four-wheeler collision
Advertisement

मायणी : 

Advertisement

पडळ फाटा (ता. खटाव) गावच्या हद्दीत दोन चार चाकी वाहनांच्या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने हनुमंत दादासो सावंत (वय 42, रा. दिवड ता. माण) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पडळ फाटा येथील अपघातांची मालिका सुरूच असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग गाफील असल्याचे पहायला मिळत आहे.

मयत हनुमंत दादासो सावंत हे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक एम.एच. 11 बी.एच. 0423 या गाडीतून विट्यास जात होते. त्यावेळी ढोकळवाडी (ता. खटाव) गावचे हद्दीत पडळ फाटा येथे पडळ बाजूकडून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनी वॅगनार एम. 12 एन. एक्स. 4378 वरील चालक प्रणय गणेश यादव (रा. सणसवाडी ता. शिरूर जि.पुणे) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात गाडी चालवून हनुमंत चव्हाण यांच्या ड्रायव्हर बाजूचे दरवाजाजवळ जोराची धडक दिल्याने या अपघातात हणमंत सावंत यांचा मृत्यू झाला. या अपघातची फिर्याद मयत हनुमंत दादासो सावंत यांचे मेव्हुणे नवनाथ किसन शिंदे (रा. दिवड) यांनी वडूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

Advertisement

या घटनेचा तपास वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रांत पाटील करीत आहेत.

अपघाताची मालिका सुरुच

पडळ फाटा हा चौक कातरखटाव - कलेढोण व मायणी - म्हसवड या मार्गाना भेदणारा आहे. पडळ कारखाना संबंधित ऊस वाहतूक आणि पंचक्रोशीतील हजारो वाहने या ठिकाणाहून ये जा करत असतात. परंतु याठिकाणी स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही येथे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले नाहीत. या मागणीकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यामुळे या ठिकाणाची अपघात मालिका सुरूच आहे.

Advertisement
Tags :

.