For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक देश, तीन राजधान्या

06:33 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक देश  तीन राजधान्या
Advertisement

सर्वसाधारणपणे एका देशाला एकच राजधानी असते, हे आपल्याला महित आहे.  तथापि, या जगात एक देश असा आहे, की ज्याला तब्बल तीन राजधान्या आहेत. तीन राजधान्या असणारा हा जगातील एकमेव देश आहे. काही देशांच्या दोन राजधान्या असतात. तर काही देशांची एक मुख्य आणि एक उपराजधानीसुद्धा असू शकते. पण तीन मुख्य राजधान्या असणारा हा एकच देश आहे.

Advertisement

या देशाचे नाव असे सर्वपरिचित आहे. तो देश आहे दक्षिण आफ्रिका. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असणारा या देशाला तीन राजधान्या आहेत. प्रिटोरिया ही या देशाची प्रशासकीय राजधानी आहे. येथे या देशाच्या सरकाचे प्रशासकीय मंडळ काम करते. या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ याच राजधानीत कार्यरत असते. या देशाची दुसरी राजधानी आहे केपटाऊन. ही संसदीय राजधानी मानली जाते. या राजधानीत या देशाची संसद असून तिची अधिवेशने येथे होतात. तसेच येथे या देशातील प्रांतीय मंडळेही आहेत. तिसऱ्या राजधानीचे नाव आहे, ब्लोएमफोन्टिन. ही या देशाची न्यायिक राजधानी असून ती एका स्वतंत्र राज्यप्रांतात (फ्री स्टेट) आहे. हा प्रांत या देशाच्या मध्यात आहे.

या देशाच्या अशा तीन राजधान्या का आहेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर या देशाच्या इतिहासात दडलेले आहे. या देश स्वतंत्र होण्यापूर्वी त्यावर अनेक परकीय शक्तींनी राज्य केले होते. त्या शक्तींची शासनकार्ये या तीन शहरांमध्ये चालत होती. त्यामुळे या शहरांमध्ये त्या स्वरुपाच्या पायाभूत सुविधा होत्या. स्वातंत्र्यानंतर या सुविधा लक्षात घेऊन तीन राजधान्या घोषित केल्या आहेत. ज्या राजधानीच्या शहरामध्ये जी कार्यालये होती ती एका राजधानीत न हलविता तेथेच ठेवण्यात आली. परिणामी, या तीन राजधान्या आहेत.

Advertisement

Advertisement

.