Sangli : बोरगावातील गाई चोरी प्रकरणी एकजण जेरबंद
आरआयटी कॉलेज रोडवर अटक पोलिसांनी हस्तगत केल्या दोन गाई
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील झालेल्या जर्शी गाई चोरीचा छडा इस्लामपूर पोलीसांनी १५ दिवसात लावला. पोलीसांनी संजू सदाशिव हिरट्टी (३९ रा. कातराळ, ता. कागवाड, जिल्हा बेळगाव) याला आरआयटी कॉलेज रोडवर जेरबंद केले. त्याच्या कडून २ गाई ताब्यात घेतल्या.
बोरगाव येथील हर्षल भिमराव वाटेगावकर यांच्या जनावराच्या गोठ्यातील दोन जर्शी गाईंची १३ ऑक्टोबर रात्री ते दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली होती. या प्रकरणी दि. १८ ऑक्टोबर पोलीस उपाधिक्षक अरुण पाटील रोजी गुन्हा दाखल झाला होता. यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहा. पोलीस फौजदार उदयसिंग पाटील, हवलदार कुबेर खोत, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कॉ. दिपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे यांना संशयीत आरआयटी कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हिरट्टी याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गाई चोरीची कबुली दिली.
त्याने चोरीतील गाई, इस्लामपूर ते जुनेखेड रस्त्यावरील ओळखीच्या व्यक्तीच्या गोठ्यात ठेवल्याचे सांगितले. तेथून या गाईंचा ताबा घेतला.