कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूकविषयक सर्व सुविधांसाठी एकच अॅप

06:12 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणूक आयोगाचा निर्णय : 40 हून अधिक विद्यमान अॅप्सना फाटा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय निवडणूक आयोग देशभरातील कोट्यावधी मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांसाठी एक मोठे डिजिटल परिवर्तन घडवून आणणार आहे. आयोग लवकरच ण्घ्ऱ्ंTिं नावाचे एकल-प्लॅटफॉर्म अॅप लाँच करणार आहे. या अॅपमध्ये निवडणुकीशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत. हे अॅप निवडणूक आयोगाच्या 40 हून अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब अॅप्लिकेशन्सना एकत्रित करणार असल्याची माहिती देण्यात आली.

मतदार आणि अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती कोणत्याही अडचणीशिवाय पुरविण्यासाठी ण्घ्ऱ्ंTिं हे अॅप कार्यरत राहील. हे अॅप विशेषत: युजर इंटरफेस (युआय) आणि सुकर युजर एक्स्पिरियन्ससह (युएक्स) डिझाइन केले जात आहे. साहजिकच आता वेगवेगळे अॅप्स वारंवार डाउनलोड करण्याची आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. या आधुनिक व्यासपीठाची संकल्पना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मार्च 2025 मध्ये निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) बैठकीत मांडली होती.

सहजगत्या सर्व माहिती मिळणार

ण्घ्ऱ्ंTिं द्वारे, वापरकर्ते आता आपल्या मोबाईल किंवा डेस्कटॉपवरून महत्वाची निवडणूक माहिती मिळवू शकतील. विशेष म्हणजे या अॅपवर अपलोड केलेली सर्व माहिती केवळ अधिकृत निवडणूक अधिकारीच प्रविष्ट करतील. या माध्यमातून माहितीसंबंधीची अचूकता राखली जाईल. तथापि, कोणत्याही वादाच्या बाबतीत, वैधानिक फॉर्ममध्ये भरलेली माहिती अंतिम मानली जाईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article