महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘कॅपिटल वन’ तर्फे आजपासून एकांकिका स्पर्धा

10:36 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आभासी तत्वावर प्रक्रिया राबवून दिग्गज संघांची  निवड : उद्या बक्षीस वितरण

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या नाट्या परंपरेला चालना देण्यासाठी पॅपिटल वन संस्थेतर्फे शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 रोजी आंतरशालेय व आंतरराज्य एकांकिका स्पर्धा कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. नाट्यारसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका अनुभवयास मिळावी या हेतूने संस्थेने आभासी तत्वावर निवड प्रक्रिया राबवून दिग्गज संघांची यामध्ये निवड केली आहे. शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात जिल्हा मर्यादित आंतरशालेय स्पर्धा झाल्यानंतर आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.  सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात येणार आहे. रविवार दि. 4 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत एकांकिका सादर होणार असून, त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे आणि चोखंदळ नाट्यारसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका पाहता यावी यासाठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी दिली.

Advertisement

एकांकिका व संघ पुढीलप्रमाणे

शनिवार दि. 3 रोजी सकाळी आंतरशालेय गटाच्या स्पर्धा होतील. रविवार दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता इम्युनो काँप्रमाईज (कोल्हापूर), 11 वाजता विषण्ण (इस्लामपूर), 12 वाजता चिनोबा (इचलकरंजी), 1 वाजता फिनिक्स (जयसिंगपूर), दुपारी 3 वाजता कूपन (इचलकरंजी), 4 वाजता संपर्क क्रमांक (मुंबई), 5 वाजता बिईंग अँड नथिंग (कोल्हापूर), 6 वाजता इंट्रेगेशन (मुंबई) या एकांकिका सादर होणार आहेत.

परीक्षकांचा परिचय

‘भीती अन् भिंती’ पुस्तकाचे  संकलन-संजय हळदीकर

संजय हळदीकर हे कोल्हापूर येथील असून, त्यांचे शिक्षण बीकॉम झाले आहे. राज्यस्तरीय सफदर हश्मी पथनाट्या स्पर्धा, रंग संवाद नावाचा रंगमंचीय उपक्रम तसेच नाट्या लेखन कार्यशाळा राबवली आहे. थिएटर विषयक वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने झाली असून, अनाथ मुले व वारांगणांच्या मुलांसाठी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर संशोधनात्मक कार्यशाळा घेतल्या आहेत. या कार्यशाळेतून संशोधित झालेली ‘भीती आणि भिंती’ पुस्तकाचे त्यांनी संकलन केले आहे.

700 हून अधिक एकांकिका स्पर्धेमध्ये परीक्षण-सचिन धोपेश्वरकर

सचिन श्रीरंग धोपेश्वरकर हे सावंतवाडी येथील नाट्यादर्शन या संस्थेशी 1993 पासून संबंधित आहेत. 1996 पासून ते या संस्थेचे सचिव आहेत. नाट्या शिबिरामध्ये जयदेव हट्टंगडी यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार डॉ. कोटा शिवराम कारंथ यांचे व गुऊ संजीव सुवर्णा यांचेही यक्षगान विषयक मार्गदर्शन लाभले. 700 हून अधिक एकांकिका स्पर्धेमध्ये परीक्षण केले आहे. नाटक, चित्रपटाशी संबंधित विविध ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली आहेत.

1976 पासून मराठी रंगभूमीवर कार्यरत - तुषार भद्रे

तुषार भद्रे साताऱ्याचे असून, 1976 पासून ते मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. सात नाटके, 18 एकांकिका व 16 पथनाट्यांचे लेखन केले आहे. 52 नाटक तर दीडशेहून अधिक एकांकिकांचे दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा केली आहे. जागतिक कीर्तीचे नाट्यादिग्दर्शक पीटर ब्रूक, हिंदी रंगभूमीवरील नाट्यादिग्दर्शक बन्सी कौल, अमोल पालेकर यांच्या सोबत रंगभूमी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. लोक रंगमंच सातारा या नाट्यासंस्थेचे ते संस्थापक आहेत. एक होता विदूषक, ‘पाच शक्तिमान’ यासह पाच मराठी चित्रपट व ‘अपहरण’ या हिंदी चित्रपटातून अभिनय केला आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article