For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील दोन महापालिकांसह 11 पालिकांच्या निवडणूकींचे वेध

04:58 PM Nov 28, 2024 IST | Radhika Patil
जिल्ह्यातील दोन महापालिकांसह  11 पालिकांच्या निवडणूकींचे वेध
Elections to 11 municipalities, including two municipalities, in the district are underway.
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कोल्हापूर जिल्हयातील दोन महापालिकेसह 11 नगरपालिकांच्या सभागृहांची मुदत संपली आहे. या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका अद्याप झाल्या नाहीत. जून एप्रिल मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होऊन जून 2024 मध्ये लोकसभेचे नवीन सभागृहत अस्तित्वात आले. त्यानंतर नुकतीच महाराष्ट्रातील विधानसभेचीही निवडणूक झाली. यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी या महापालिकेसह 11 नगरपालिकांचा समावेश आहे. आता तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील का याकडे इच्छुकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन महापालिका आहेत. इचलकरंजी नगरपालिकेचे जून 2022 मध्ये महापालिकेत रुपांतर झाले. पण महापालिकेत रुपांतर झाल्यापासून इचलकरंजी महापालिकेची निवडणूकच झाली नाही. या ना त्या कारणाने या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. जिल्ह्यात 13 नगरपालिका असून आजरा, हातकणंगले आणि चंदगड या नवीन नगरपालिका झाल्या आहेत. त्यापैकी हातकणंगले आणि चंदगड नगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात असून 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत या सभागृहाची मुदत आहे. दोन महिन्यात या दोन्ही नगरपालिकांच्या सभागृहांची मुदत संपत आहे. तर जयसिंगपूर, कागल, मुरगूड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, वडगाव, मलकापूर, पन्हाळा, हुपरी, शिरोळ, आजरा या नगरपालिकांची मुदत 16 डिसेंबर 2023 रोजीच संपली आहे. मुदत संपून एक वर्ष होत आले. पण या नगरपालिकांच्याही निवडणूका झाल्या नाहीत.

Advertisement

लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक झाल्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या निवडणूका लवकर घ्याव्यात अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इच्छुकांची पेरणी

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले.23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होऊन महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. विधानसभेच्या या निवडणूकीच्या प्रचारात महापालिका आणि नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी आपली पेरणी केली आहे. यामुळे इच्छुकांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वेध लागले आहेत.

महापालिका                                                             सभागृह मुदत

कोल्हापूर महापालिका                                   9 सप्टेंबर 2020 मुदत संपली

इचलकरंजी महापालिका                              जून 2022 महापालिकेत रुपांतर.निवडणूक नाही

नवीन अस्तित्वात आलेली नगरपालिका

आजरा                                                           9 मे 2023

नवीन पण सभागृत अस्तित्वात असलेल्या नगरपालिका

हातकणंगले                                           18 फेब्रुवारी 2025 पर्यंत

चंदगड                                                         18 फेब्रुवारी 2025 पर्यंत

16 डिसेंबर 2021 मुदत संपलेल्या नगरपालिका

जयसिंगपूर नगरपालिका

कागल नगरपालिका

मूरगूड नगरपालिका

गडहिंग्लज नगरपालिका

कुरुंदवाड नगरपालिका

वडगाव नगरपालिका

मलकापूर नगरपालिका

पन्हाळा नगरपालिका

हुपरी नगरपालिका

शिरोळा नगरपालिका

 

Advertisement
Tags :

.