कोणत्या आधारावर शेतकऱ्यांची नावे कमी केली?
कणबर्गीतील शेतकऱ्यांची माहिती देण्याची मागणी
बेळगाव : कणबर्गी गावात बुडाकडून स्कीम नं. 61/2007 राबविण्यासाठी जमिनीच्या मूळ मालकांचे नाव कमी करून बुडाने सदर जमीन आपल्या नावे केली आहे. कोणत्या आधारावर शेतकऱ्यांची नावे कमी करून बुडाचे नाव दाखल करण्यात आले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवार दि. 12 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कणबर्गी गावातील सर्व्हे नं. 514, 512/2बी, 518/5, 518/7, 511, 487/1, 503/1, 499/1, 488/2, 518/2 आणि 492/9 या जमिनीवरील शेतकऱ्यांची नावे कमी करून बुडाचे नाव दाखल करण्यात आले आहे. कोणत्या आधारावर शेतकऱ्यांची नावे कमी करून बुडाचे नाव दाखल करण्यात आले आहे याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. निवेदन दिलेल्या 7 दिवसांच्या आत याबाबतची माहिती द्यावी. माहिती न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.