For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्साहाच्या वाटेवर

06:41 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्साहाच्या वाटेवर
Advertisement

उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम्।

Advertisement

सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम्?

अर्थ-हे भल्यामाणसा, उत्साह दाखव (आणि सज्ज हो). उत्साहापेक्षा

Advertisement

श्रेष्ठ बळ नाही. ह्या जगात उत्साही माणसाला काहीच अशक्य नाही.......

आम्ही सगळे फुटबॉलची मॅच पाहायला मैदानावर गेलो होतो. सगळेजण ठरवून दिलेल्या खुर्च्यांवर बसले होते, पण आमच्या पलीकडचे एक दोन जण खुर्चीत न बसता प्रत्येक गोलच्या वेळी जोरदार उड्या मारून त्या खेळाडूंचे कौतुक करत होते. मॅच इतकी रंगात आली की मॅच जिंकणाऱ्या संघासाठी आनंद व्यक्त करताना आमच्या शेजारच्या बसलेल्या लोकांपैकी एक दोघांनी चक्क त्या स्टॅन्डवरून खाली उडी मारून त्या संघाचे कौतुक करायला ते निघाले होते. उडी मारताना त्यांचा पाय सटकला आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. सगळ्या लोकांनी त्यांना खूप नावं ठेवली. या वयाला अशा उड्या मारणे शोभतं का? वगैरे वगैरे. परंतु त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद त्या ठिकाणी त्यांनी शाबूत ठेवला होता. ह्याचं समाधान त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांच्यातलं लहान मूल त्यांनी अजूनही जपलं होतं. आम्ही मात्र बाकीचे सगळे लोक चौकोनी चेहरे करून फक्त टाळ्या वाजवून किंवा किंचित गालात हसून आनंद व्यक्त करत होतो. आनंद, उत्साह, हे ओसंडून वाहिले पाहिजे, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जाणवतात. खरंतर उत्साह म्हणजे अॅनी बेझंट यांच्या म्हणण्यानुसार कॉस्मिक लेयर की, जो एनर्जी सोर्स असतो. ज्याच्यासाठी आम्हाला सातत्याने अभ्यास करायला लागतो. आम्ही गाणाऱ्या लोकांना बरेचदा तेच तेच गाणे म्हणताना किंवा तेच तेच राग आळवतांना बघतो परंतु असे गाणारे लोक, मी आज जे गायलोय त्याच्यापेक्षा उद्या आणखीन चांगलं कसं गाईन, असा एक प्रकारचा अभ्यास करत असतात. यातूनच त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळत असते. एखादा चित्रकार नेहमी चित्र काढत असला तरी तो दुसऱ्या दिवशी आणखीन कसं उत्तम चित्र काढता येईल याचा अभ्यास करत असतो. कारण ते चित्र काढण्यासाठी त्याच्यामध्ये एक उर्जेचा स्त्राsत निर्माण झालेला असतो. असे स्त्राsत आमच्याकडे नसतातच. आम्ही जन्माला आल्यापासून आता आणखीन अमुक एक गोष्ट करून मला काय मिळणार आहे? असे निराशेचे स्वर लावून बसतो.

पूर्वार्ध

Advertisement
Tags :

.