Satara : वल्लभभाई पटेल 150 व्या जयंतीनिमित सातारा - दहिवडीत एकता दौडचे आयोजन
देशभक्तीपर वातावरणात वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त दौड आयोजित
सातारा : सरदर वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून सातारा व दहिवडी शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. या दौडमध्ये सातारा व दहिवडी शहर वासियांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात एकता दौड संदर्भात आयोजित बैठकीत अपर जिल्हाधिकारी माने बोलत होते. या बैठकीला उपपोलीस अधीक्षक अतुल सबणीस, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे शिक्षक उपस्थित होते.
एकता व दक्षता जनजागृती दौडीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, सेवाभावी नोंदणीकृत संस्था, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊड गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, नागरिक, खेळाडू यांचा समावेश करुन घ्यावा. तसेच पोलीस विभागाने दौडीमध्ये बँन्ड पथकाचा समावेश करावा, असेही अपर जिल्हाधिकारी माने यांनी सांगितले.
सातारा शहरात ज्या पद्धतीने एकता दौडचे नियोजन करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने दहिवडी येथील दौडीचे आयोजन करावे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी माने म्हणाले, या दोन्ही दौडीमध्ये राष्ट्रध्वज, देशभक्तीपर वेशभूषा तसेच संविधानावर आधारित फलकांचा समावेश करावा. तसेच दौडीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करावी, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी माने यांनी केल्या