Karad Municipal: निवडणुकीच्या निमित्ताने कराड पालिका मालामाल!
निवडणूक काळात कराड पालिकेत सव्वा कोटींचा कर जमा
कराड : निवडणूक लढवण्यासाठी पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या मिळकतीचा कर पालिकेत भरावा लागतो. त्यानुसार नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या साडेतीनशेहून अधिक उमेदवारांनी सुमारे सव्वा कोटी रूपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केल्याने निवडणुकीच्या निमित्ताने कराड नगरपालिका मालामाल झाली आहे.
कराड नगरपालिका हद्दीत जवळपास तीन हजार दोनशे मिळकतींची नोंद असून त्यापोटी वर्षाला २२ कोटी रूपयांची पालिकेची कर मागणी आहे. करवसुली विभागाच्या वतीने वर्षभर करवसुलीचे काम सुरू असते. तरीही अनेक मिळकतधारक कर भरण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे मार्च एन्डच्या तोंडावर पालिकेच्या करवसुली विभागाकडून कर
निवडणूक होताच मिशन मार्च एन्ड
सध्या पालिकेचे अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहेत. निवडणुकीचे काम पूर्ण होताच करवसुली विभागाचे मिशन मार्च एन्ड सुरू होणार आहे. तीन महिन्यांवर आर्थीक वर्षाआखेर आल्याने प्रतिवर्षाप्रमाणे कर वसुली विभागाला याहीवर्षी कर वसुलीसाठी कंबर कसावी लागणार आहे. वसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात येते. थकबाकीधारकांची नळ कनेक्शन तोडणे, थकबाकीधारकांच्या नावाचे फ्लेक्स बोर्ड लावणे आदी मार्ग कर वसुलीसाठी अवलंबले जातात.
नगरपालिकेची जवळपास ८ ते ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक जाहीर झाल्याने कराड शहरात इच्छुकांना अक्षरशः उधाण आले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक होणार असल्याने व नगराध्यपदाचे 7100 120 आरक्षण सर्वसाधारण असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होणार याचा आंदाज शहरवासीयांना यापुर्वीच आला होता. त्यानुसार निवडणुकीची घोषणा होताच प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने इच्छुकांची नावे समोर आली.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच उमेदवारांना पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते. ते मिळवण्यासाठी त्या उमेदवाराला पालिकेचा संपूर्ण कर भरावा लागतो.
त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठीचा कालावधी सुरू झाल्यानंतर पालिकेत कर भरण्यासाठी व ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या काळात पालिकेच्या तिजोरीत सुमारे सव्वा कोटी रूपयांचा कर जमा झाला आहे. या निवडणूकीसाठी नगराध्यक्षपद व नगरसेवकपदासाठी जवळपास साडेतीनशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी पालिकेचा कर भरल्याने पालिका मालामाल झाली आहे.