सप्ताहाच्या अंतिम दिवशी बाजार घसरणीत
सेन्सेक्स 230 तर निफ्टी 34 अंकांनी प्रभावीत : विदेशी गुंतवणूकदारांमुळे बाजारात नुकसान
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या शेवटच्या सत्रात म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने घसरण नोंदवली. विदेशी गुंतवणूकदारांनी माघार घेतल्याने बाजार प्रभावीत होत बंद झाला आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी होतील या चिंतेमुळे आणि राजकीय गोंधळात वाढ झाली असल्याचा परिणामही भारतीय बाजारावर झाला आहे.
बीएसईचा 30 समभागांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 230.05 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 81,381.36 वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 देखील 0.14 टक्क्यांसोबत 34.20 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,964.25 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टीसीएस सर्वाधिक 1.84 टक्क्यांनी घसरला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक यांचे समभाग मोठ्या प्रमाणात प्रभावीत राहिले होते. दुसरीकडे एचसीएल टेक, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, टायटन, सन फार्मा, टाटा स्टील, एल अँड टी आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
आज बाजारातील घसरणीचे कारण?
कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे कमकुवत निकाल आणि भू-राजकीय संकट अधिक बिघडण्याची भीती आणि परदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे भारतीय शेअर बाजार घसरला. तज्ञांच्या मते, बँका, युटिलिटी क्षेत्र आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीमुळे दोन्ही निर्देशांक घसरले. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंड आणि परदेशी निधीचा सतत प्रवाह यामुळेही गुंतवणूकदारांची स्थिती नकारात्मक राहिल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारात
आशियातील इतरत्र, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग तेजीत होता. तर चीनचा शांघाय कंपोझिट आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी घसरला. युरोपियन बाजारात संमिश्र कल होता. गुरुवारी अमेरिकी बाजार घसरणीसह बंद झाले.