ऐन दिवाळीच्या तोंडावर मनपाकडून इंग्रजी जाहिरात फलकांवर कारवाई
11:11 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
व्यापारी-नागरिकांतून नाराजीचा सूर
Advertisement
बेळगाव : जाहिरात फलकांवर व आपल्या आस्थापनांवर इंग्रजी फलक लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. राज्योत्सवाच्या तोंडावर कन्नडसक्तीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी सायंकाळी चन्नम्मा चौक परिसरात असलेले काही इंग्रजी फलक हटविण्यात आले. अधिकाऱ्यांनी काही दुकानांचीही तपासणी केली. केवळ इंग्रजीत फलक लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यावेळी नूतन आयुक्त शुभा बी., आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, महसूल अधिकारी रेश्मा तालीकोटी व इतर अधिकारी उपस्थित होते. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या कन्नडसक्तीच्या या कारवाईने खळबळ माजली आहे.
Advertisement
Advertisement