महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हनीट्रॅपच्या माध्यमातून सराफाला लाखोंचा गंडा

11:14 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहापूरच्या युवतीसह चौघांना अटक : आणखी एक आरोपी फरार : साडेतेरा लाखांचा ऐवज जप्त

Advertisement

बेळगाव : टिळकवाडी येथील एका सराफी व्यावसायिकाला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविल्याच्या आरोपावरून एका विद्यार्थिनीसह चौघा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 10 लाख रुपये रोख रक्कम, तीन मोटारसायकली व एक मोबाईल फोन असा एकूण 13 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मंगळवारपेठ, टिळकवाडी येथील विनायक सुरेश कुरडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिव्या प्रदीप सबकाळे, रा. बसवाण गल्ली शहापूर, प्रशांत ऊर्फ स्पर्श कल्लाप्पा कोलकार (वय 25) रा. गाडेमार्ग शहापूर, कुमार ऊर्फ डाली, अर्जुन गोकरक्कनवर (वय 29) रा. ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी, राजू सिदराई जडगी (वय 29) रा. कणबर्गी यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

या प्रकरणातील आणखी एक जण फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. हनीट्रॅपचा हा प्रकार आहे. शहापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. ए. चौगला, आय. आर. सनदी, हवालदार नागराज ओसप्पगोळ, शिवशंकर गुडदयगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हादीमनी, संदीप बागडी, सिद्धरामेश्वर मुगळखोड, विजय कमते, कावेरी कांबळे, प्रतिभा कांबळे आदींनी ही कारवाई केली आहे.

आणखी दहा लाखांची होती मागणी 

विनायक कुरडेकर यांनी मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. बसवाण गल्ली येथे भाड्याने राहणाऱ्या दिव्या झोपेत असताना विनायक यांनी खांद्याला हात लावून तिला उठवले होते. याचा व्हिडिओ करण्यात आला होता. तो व्हिडिओ दाखवून आतापर्यंत पंधरा लाख रुपये उकळण्यात आले होते. आणखी दहा लाखांची मागणी करण्यात आली होती. सराफी व्यावसायिकाने पोलिसात धाव घेताच शहापूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. दिव्या व प्रशांत हे दोघे विद्यार्थी आहेत. कुमार व राजू हे दोघे इलेक्ट्रिकचे काम करतात. या चौघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article