For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रचाराच्या आघाडीवर..

06:12 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रचाराच्या आघाडीवर
Advertisement

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात लोकांच्या खासगी संपत्तीची सर्वेक्षणे केली जातील आणि खासगी संपत्तीचे पुनर्वाटप केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. याचा सरळ अर्थ असा की आता तुमची घरे आणि मालमत्ताही काढून घेतली जाईल. तेव्हा देशातील प्रत्येक नागरीकाने काँग्रेसपासून सावध रहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते राजस्थानातील बन्सवारा येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत भाषण करीत होते. काँग्रेस आता माओवादी तत्वज्ञानाने पछाडली गेली आहे, अशी कठोर टीका त्यांनी भाषणात केली.

Advertisement

काँग्रेसच्या युवराजांची वक्रदृष्टी आता लोकांच्या खासगी मालमत्तांवरही पडली आहे. त्यामुळे महिलांची मंगळसूत्रेही धोक्यात येतील. लोकांच्या खासगी संपत्तीची गणना करण्याचा कुटील डाव काँग्रेसने आखला आहे. यामुळे कष्टाने मिळविलेल्या संपत्तीवरील अधिकारही धोक्यात येणार आहे. या देशाच्या संपत्तीवर प्रथम अधिकार मुस्लीमांचा आहे, असे विधान काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले होते. या विधानाची आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दिली. तुमची संपत्ती काढून घेऊन ती कोणाला दिली जाईल, याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

सोने-चांदीही ओढतील

Advertisement

भारतात गरीब महिलांकडेही गुंजभर सोने असते. आदीवासी महिलांकडे चांदी असते. आपल्या घरातील महिलांकडेही सोने-चांदीच्या स्वरुपात ‘स्त्रीधन’ असते. ही संपत्तीही धोक्यात आणण्याचा काँग्रेसचा कट आहे. देशातील लोकांची लूट करणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशा समजुतीत काँग्रेस आहे. पण जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशा अर्थाची टीकाही त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.