महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रचाराच्या आघाडीवर..

06:25 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केजरीवाल कोण... राम की लक्ष्मण ? 

Advertisement

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच, मद्यधोरण घोटाळ्यातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मधुमेहाचा प्रश्न राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. केजरीवाल सध्या दिल्लीच्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मधुमेहाचा मोठा त्रास आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मंगळवारी इन्शुलिन देण्यात आले. हे इन्शुलिन जणू रामायणातील संजीवनी वनस्पती आहे, अशा प्रकारे या पक्षाने हनुमानाच्या वेषभूषेत असलेल्या व्यक्तीच्या हाती इन्शुलिनची बाटली देऊन प्रतिकात्मक शोभायात्रा काढण्यात आली. पण यामुळे या पक्षाचे ‘राम“ कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आपल्यासाठी इन्शुलिनची व्यवस्था करावी, असे आपण प्रतिपादन केले होते. तथापि, सरकार आपल्याला इन्शुलिन देत नाही, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांना हळूहळू ठार मारण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने केजरीवाल यांची इन्शुलिनची मागणी फेटाळली होती.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोस

तथापि, मंगळवारी त्यांची साखर वाढल्याने एम्सच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना इन्शुलिनचा छोटा डोस देण्यात आला. आम आदमी पक्षाने या बाबीचेही राजकारण करण्याची संधी साधली. केजरीवाल यांना देण्यात यावे म्हणून इन्शुलिनची हनुमानजयंतीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. त्यात एका व्यक्तीला भगवान हनुमानाच्या वेषभूषा करुन मिरवणुकीत समाविष्ट करण्यात आले. या ‘हनुमाना“च्या हाती इन्शुलिनीची बाटली होती. रामायणकाळात  हनुमानाने संजीवनी वनस्पती असलेला डोंगर  उचलून युद्धभूमीच्या स्थानी आणल्याचा उल्लेख रामायणात आहे. त्याचप्रमाणे केजरीवालरुपी रामासाठी आम्ही ही हनुमानाच्या हाती इन्शुलिन देऊन प्रतिकात्मक शोभायात्रा काढली आहे. कारण केजरीवाल यांच्यासाठी इन्शुलिन ही संजीवनीच आहे, असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी नंतर स्पष्ट केले. त्यातून एक नवीनच प्रश्न निर्माण झाला असून पक्षाची कोंडी झाली आहे.

आम आदमी पक्षाचा ‘राम“ कोण ?

रामायणात संजीवनी वनस्पती प्रभू रामचंद्रांसाठी नव्हे, तर त्यांचे बंधू लक्ष्मण यांच्यासाठी आणण्यात आली होती. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडले होते. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी संजीवनी वनस्पतीचा उपयोग करण्यात आला होता. तथापि, रामायाणातील या घटनेचे अनुकरण करताना आम आदमी पक्षाकडून केजरीवाल यांच्यासाठी इन्शुलिनरुपी ‘संजीवनी’ ‘हनुमाना’च्या रुपातील व्यक्तीकडून आणण्यात आली असेल, तर केजरीवाल हे आम आदमी पक्षाचे राम नव्हे, तर लक्ष्मण ठरतात. मग आम आदमी पक्षाचा ‘राम“ कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article