For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सव-ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे शहरात पथसंचलन

11:52 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सव ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे शहरात पथसंचलन
Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन झाले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन झाले. शुक्रवारी सायंकाळी कित्तूर चन्नम्मा चौकपासून पथसंचलनाला सुरुवात झाली. काकतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौकपासून कपिलेश्वर तलावापर्यंत अधिकारी व पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस दलाने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद बंदोबस्ताची तयारी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वासाची भावना निर्माण व्हावी, यासाठी पथसंचलन करण्यात आले आहे. यामध्ये मार्केटचे एसीपी सोमेगौडा, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह शहरातील बहुतेक पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.