महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

22 जानेवारीला घरोघरी श्रीराम ज्योती पेटवा!

06:58 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अयोध्यानगरीतून पंतप्रधानांचे आवाहन : श्री रामलल्लांच्या आगमनानिमित्त संपूर्ण जग दिव्यांनी उजळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 30 डिसेंबरला अयोध्येला पोहोचले. यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. 22 जानेवारीचा ऐतिहासिक क्षण आपल्या जीवनात सुदैवाने आला आहे. मी भारताच्या 140 कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना करत आहे. 22 जानेवारीला प्रभू राम अयोध्येत विराजमान होताना घरोघरी रामज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा. 22 जानेवारीला प्रत्येकजण अयोध्येत येणे शक्मय नाही. गर्दीमुळे व्यवस्था बिघडण्याचा धोका असल्यामुळे 22 जानेवारीचा औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर लोकांनी आपल्या सोयीनुसार अयोध्येत यावे, अशी विनंती पंतप्रधानांनी रामभक्तांना केली आहे.

अयोध्येत भगवान श्री रामाच्या मंदिराची उभारणी आणि श्री रामलल्लांच्या स्थापनेचा उत्सव साजरा होत असताना केवळ देशच नाही तर संपूर्ण जग दिवाळीच्या दिव्यांनी उजळले जाईल. या सोहळ्यातून संपूर्ण देशाला ऊर्जा, आशा, आकांक्षा आणि उत्साहाने भरलेली नवी दिवाळी पाहायला मिळणार आहे. ही दिवाळी केवळ देशातच नव्हे, तर जगातील सर्व देशांमध्ये जिथे भारतीय राहतात किंवा जिथे भारतीय दूतावास आहेत तिथे साजरी केली जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. 14 जानेवारीच्या मकर संक्रांतीपासून 22 जानेवारीपर्यंत लोकांनी आपली घरे, गावे आणि आसपासची मंदिरे स्वच्छ ठेवून श्री राम उत्सव साजरा करावा, असेही ते म्हणाले. भजन-कीर्तन व इतर भक्तिमय कार्यक्रम करा. 22 जानेवारीच्या संध्याकाळी दिवाळी साजरी करा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. लंकेत रावण आणि राक्षसांचा वध करून प्रभू श्रीराम ज्या पद्धतीने अयोध्येत परतले आणि त्यांच्या परतीचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी केली, त्याच पद्धतीने 22 जानेवारीलाही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. आता प्रभू राम यांना 500 वर्षांनंतर कायमस्वरूपी घर मिळाले आहे, असे अयोध्येतून पंतप्रधान मोदी म्हणाले. याशिवाय देशातील 4 कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले. 22 जानेवारीला पंतप्रधान अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या प्रभू श्री राम मंदिराचे उद्घाटन करतील आणि त्याचदिवशी श्री रामलल्ला मंदिरात विराजमान होतील.

ऐतिहासिक क्षणाची जगाला उत्सुकता

22 जानेवारीचा दिवस यापुढे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या  दिवशी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात भव्य आणि अप्रतिम दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात परदेशातील भारतीय दूतावासांनाही सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभू श्री राम मंदिराचे उद्घाटन भारतासह संपूर्ण जगाला थेट दाखवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. जगभरात स्थायिक झालेले भारतीय या दिवशी आपल्या घरांमध्ये दिवे लावून दिवाळी साजरी करतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article