महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आप’तर्फे राघव चड्ढा राज्यसभेतील पक्षनेते

06:41 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पक्ष नेतृत्त्वाकडून राज्यसभा अध्यक्षांना पत्र

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आम आदमी पार्टीने संजय सिंह यांच्या जागी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांची राज्यसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. आप पक्षनेतृत्वाने त्यांचे नाव निश्चित केले आहे. संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा आतापासून वरिष्ठ सभागृहात पक्षाचे नेते असतील, असे राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात आम आदमी पार्टीच्यावतीने कळविण्यात आले आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आपचे खासदार संजय सिंह सध्या तुऊंगात असल्यामुळे ही जबाबदारी आता चड्ढा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चड्ढा यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याबाबत आपकडून पत्र प्राप्त झाल्याचे राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हे पत्र राज्यसभेच्या सरचिटणीसांकडे आहे.

राघव चढ्ढा हे आम आदमी पक्षातील एक प्रमुख चेहरा असून ते पक्षाच्या वतीने राज्यसभेत वेळोवेळी आवाज उठवत असतात. गेल्या सत्रात 11 ऑगस्ट 2023 रोजी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची भेट घेऊन माफी मागण्याचे निर्देश त्यांना दिले होते. या माफीनाम्यानंतर 115 दिवसांनी चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article