ओंमकार, सौरभची शेस्टोबॉलमध्ये सुवर्ण कामगिरी
मच्छे गावच्या दोन खेळाडूंना यश
वार्ताहर /किणये
मच्छे गावातील ओंमकार गुरव व सौरभ मुतगेकर या दोन तरूण खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय शेस्टोबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत देशाच्या टीममधून खेळून सुवर्णपदक मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या या खेळाडूंचे बेळगाव परिसरात कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय शेस्टोबॉल स्पर्धेमध्ये इंडियाच्या टिममधून सहभाग दर्शवून नेतृत्व केले. प्रचंड इच्छासक्ती व जिद्दीच्या जोरावर हे खेळाडू आपला खेळ सादर करत आहेत. त्यांनी या भागाचे नाव उंचावले आहे. ट्रीनेशन, इंटरनॅशनल शेस्टोबॉल 2023 बँकांक थायलंड येथे झाल्या. यामध्ये भारत, श्रीलंका व थायलंड या देशातील संघांचा सहभाग होता. देशातील पुरूष संघामध्ये मच्छे गावचे ओंमकार गुरव व सौरभ मुतगेकर यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बँकॉक येथे झालेल्या चेस्टोबॉल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळविले. तसेच श्रीलंका येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक यांच्या संघाने मिळविला. याचबरोबर महिला गटातून ब्रम्हनगर येथील आदीती बलीगा व शास्त्राrनगर येथील श्रेया घोणी यांनी भारतीय संघातून चेस्टोबॉल चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतला होता. या महिलांच्या संघाने बँकांक व श्रीलंका येथे झालेल्या चॅम्पियनशीपमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. हे चारही खेळाडू गोगटे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांना डॉ.अमित जडे हे कोच म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. मच्छे गावातील ओंमकार व सौरभ यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल तालुका शिवसेना प्रमुखा सचिन गोरले व इतर मान्यवरांनी त्यांची सत्कार केला आहे.