महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओमर, फारुख अब्दुल्लांची मोदींसोबत होते गुप्त बैठक!

06:02 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुलाम नबी आझादांचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गुप्त बैठका करत असतात. पितापुत्राची जोडी तपास यंत्रणांपासून वाचविण्यासठी रात्रीच्या वेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटत असल्याचा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

अब्दुल्ला पितापुत्र हे श्रीनगरमध्ये काही, जम्मूमध्ये दुसरेच काही तर दिल्लीत वेगळेच काही तरी बोलत असतात असे म्हणत डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख आझाद यांनी त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

आझाद यांनी यावेळी आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत. स्वत:च्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मी प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2014 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून आझाद यांनी लोकसभा निवडणूक लढविलेली नाही.

2024 हे जम्मू-काश्मीरसाठी निवडणुकीचे वर्ष ठरणार असल्याने स्वत:ची कंबर कसून घेण्याचे आवाहन त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.  यावेळी आझाद यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी निगडित मुद्द्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले आहे.

शेतकऱ्यांचे हे आंदोलन सरकारसाठी चांगले नाही, तसेच शेतकऱ्यांच्याही हिताचे नाही. लोकसभा निवडणूक योग्यवेळी होत आहे, परंती जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीविषयी मी केवळ अनुमानच व्यक्त करू शकतो. कारण निवडणूक आयोग किंवा सरकारशी माझा कुठलाच संपर्क नाही. परंतु यावर्षी विधानसभा निवडणूक होणार हे निश्चित असल्याचे आझाद म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article