कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओमर अब्दुल्लांना गुजरात मॉडेलची भुरळ

06:45 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्टॅच्यू ऑफ युनिटी, साबरमती रिव्हर फ्रंटचे कौतुक

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तेंडभरून कौतुक केले आहे. गुजरात दौऱ्यावर पोहोचलेल्या अब्दुल्लांनी हा पुतळा इतका भव्य असेल कशी कल्पनाही केली नव्हती असे उद्गार काढले आहेत. तसेच त्यांनी साबरमती रिव्हर फ्रंटसमवेत अनेक ठिकाणांचा दौरा करत विकासकामांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.

साबरती रिव्हरफ्रंट हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असल्याचे ओमर यांनी म्हटले आहे. तर ओमर यांच्या गुजरात दौऱ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. ओमर अब्दुल्लांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दौऱ्यामुळे अन्य लोकांनाही देशाच्या विविध हिस्स्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा मिळेल असे मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

ओमर यांनी नर्मदा धरण प्रकल्पाचे कौतुक करत त्याला गुजरातची जीवनरेषा संबोधिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही अशा प्रकल्पाची कल्पनाही करू शकत नाही. आम्हाला कधीच पाणी रोखण्याची अनुमतीच देण्यात आली नाही. आता सिंधू जल करार स्थगित झाला असलयाने भविष्यात जम्मू-काश्मीरमध्येही अशाप्रकारचे प्रकल्प होतील, ज्यामुळे वीजेची टंचाई होणार नाही. पिण्यासाठी मोठ्या प्रमाणता पाणी उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा असल्याचे ओमर यांनी म्हटले आहे. ओमर यांनी सिंधू जल कराराचा उल्लेख करत एकप्रकारे काँग्रेसला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

ओमर अब्दुल्लांनी गुजरातमधील विविध ठिकाणांना भेट देत कौतुकोद्गार काढल्याने ते भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ओमर हे सध्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याकरता त्यांना केंद्र सरकारचे म्हणजेच भाजपचे सहकार्य लागणार आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेससोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. परंतु निकालानंतर मतभेद आणि तणावाची स्थिती दिसून आली. काँग्रेस केंद्रशासित प्रदेशातील सरकारमध्ये सामील झालेला नाही. तर ओमर यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article