ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा चंदीगडमध्ये गौरव
वृत्तसंस्था/ चंदीगड
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या क्रीडापटूंचा शुक्रवारी येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला मनु भाकर, अमन सेहरावत, निरज चोप्रा, सरबज्योत सिंग, हे उपस्थित होते.
जेएसडब्ल्यु स्पोर्टस्चे संस्थापक पार्थ जिंदाल यांनी हा सामरंभ आयोजित केला होता. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या प्रत्येक खेळाडूला जिंदाल यांच्याहस्ते नवीकोरी मोटार बक्षीस म्हणून देण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 1 रौप्य आणि 5 कास्य पदकांची कमाई केली होती. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने 52 वर्षानंतर प्रथमच पाठोपाठ सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. नेमबाजीत मनु भाकरने भारताला दोन पदके मिळवून दिली. एका ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळवून देणारी मनु भाकर ही भारताची पहिली अॅथलिट आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने कास्यपदक घेतले.