ऑलिम्पिक, आशियाई खेळ विजेत्या खेळाडूंना थेट सरकारी नोकऱ्या : योगी
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये पहिल्या हॉकी इंडिया कनिष्ठ पुऊष आंतर-विभागीय स्पर्धा, 2024 चे उद्घाटन करताना नवीन क्रीडा धोरण आणण्यासह राज्यात खेळांना चालना देण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकारावर प्रकाश टाकला. योगी यांनी यावेळी खेळाविषयी लोकांच्या धारणा बदलण्यावर भर दिला तसेच ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या अथवा वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या कोणत्याही खेळाडूला थेट सरकारी नोकरी दिली जाईल, असे ठामपणे सांगितले.
दुर्दैवाने पूर्वी लोकांचा खेळाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन होता. परंतु आज अनेक सकारात्मक उपक्रम घेतले जात आहेत आणि खासगी क्रीडा अकादमींचा त्यात मोठा वाटा आहे. तऊणांमध्ये खेळाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सरकारने क्रीडा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धोरणात करण्यात येणाऱ्या तरतुदीनुसार ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई खेळ किंवा जागतिक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूला थेट भरतीद्वारे सरकारी सेवेत स्थान दिले जाईल. यामुळे त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे योगी म्हणाले.
नवीन क्रीडा धोरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच मुख्यमंत्री योगी यांनी हॉकीचे दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने राज्यात क्रीडा उद्योग स्थापन करण्याची घोषणा केली. ‘मला विश्वास आहे की, खेळांसाठी ही खूप चांगली वेळ आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की, आम्ही प्रत्येक गावात खेळाचे मैदान तयार करू.. आम्ही उत्तर प्रदेशात हॉकीतील दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या नावे क्रीडा उद्योग उभारत आहोत’, असेही ते पुढे म्हणाले.
=