For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहलक्ष्मीची झोळी... गावाला पुरणपोळी

10:26 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
गृहलक्ष्मीची झोळी    गावाला पुरणपोळी
Advertisement

सुट्टट्टी गावातील वृद्धेने गृहलक्ष्मीच्या रकमेतून घातले गावजेवण

Advertisement

बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून जमलेल्या पैशातून सुट्टट्टी, ता. रायबाग येथील एका वृद्धेने गावजेवण घातले. श्रावणानिमित्त गावकऱ्यांना पुरणपोळीचे जेवण घालणाऱ्या या वृद्धेला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रेशमी साडी पाठवून दिली आहे. सुट्टट्टी, ता. रायबाग येथील आक्काताई लंगोटी या वृद्धेने गृहलक्ष्मी योजनेतून आजवर जमा झालेल्या पैशातून गावातील सुवासिनींची ओटी भरली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरील संकटे दूर होवो, राजकारणात ते आणखी बळकट होवो, यासाठी महिलेने पुरणपोळीचे जेवण घातले आहे. ही घटना समजल्यानंतर महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आक्काताई यांच्याशी संपर्क साधून आनंद व्यक्त केला. लगेच आपल्या कार्यकर्त्यांमार्फत या वृद्धेला रेशमी साडी पाठवून तिचा गौरवही केला आहे. या गावजेवणाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. आक्काताई यांच्याशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. गावाला पुरणपोळीचे जेवण घातले, मीही तुझी लेक आहे, लेकीला बोलावणार नाही का? अशी विचारणा केली. तू तर माझी लेक आहेस, तुझ्यामुळे गृहलक्ष्मी योजनेचे पैसे जमा होतात. त्यामुळे कधीही ये, असे आमंत्रण आक्काताई यांनी लक्ष्मी हेब्बाळकरांना दिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.