कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वेच्या जुन्या डब्याचे आकर्षक घरात रुपांतर

06:40 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोफा-बेड समवेत आतील दृश्य पाहून लोक अवाक्

Advertisement

सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत असून यात  भारतीय रेल्वेच्या एका जुन्या डब्याला आकर्षक घरात बदलताना दाखविण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका जर्जर रेल्वे डब्याच्या आत शिरताच सफाईसह ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या मोठमोठ्या बाटल्या, बेड, कूलर, सोफा आणि टेलिव्हिजनही दिसून येतो. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे मात्र स्पष्ट नाही. रिकामी डब्यात अनेक लोक राहत असतात. परंतु या व्हिडिओतील रेल्वेच्या डब्याला फूल फर्निश्ड करण्यात आले आहे.

Advertisement

व्हिडिओत आतील सजावट आणि सुविधा पाहून थक्क व्हायला होते. फुल फर्निश्ड बेड्स, फॅन, एसी, पडदे, गालिचा, वॉल हँगर आणि कपाटापासून अनेक सुविधा यात आहेत. येथे कुठलीच व्यवस्था तात्पुरती नसून फुल टाइम राहण्यायोग्य आकर्षक घरासारखे दृश्य दिसून येते. आणखी एक व्हिडिओत या अनोख्या घरत राहणाऱ्या लोकांना चित्रित करण्यात आले आहे. सोशलमीडियावर या अनोख्या घराच्या कल्पनेचे कौतुक होत आहे. शहरात जागा कमी असल्याने लोकांना अशाप्रकारच्या घरांमध्ये राहण्याची सुविधा देता येऊ शकते असे अनेकांनी सुचविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article