Satara News : फलटणमध्ये शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादामुळे वृद्धाचा मृत्यू
शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादामुळे वृद्धाचा मृत्यू
लोणंद : पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती (ता. फलटण) येथे शेत-जमिनीसंदर्भातील सततच्या वादांमुळे मानसिक त्रास झाल्याचा आरोप करत काशिनाथ साधू ताम्हाणे (वय ६०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कीर्ती सागर राऊत (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील काशिनाथ साधू ताम्हाणे (वय ६०, रा. लेन नंबर २७, जनता वसाहत, पर्वती, पुणे) यांना पाच ते सहा वर्षांपासून सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे (रा. पाडेगाव फार्म) यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या शेतात वारंवार बांध फोडून शेतात पाणी सोडण्याचे प्रकार घडत होते.
या सततच्या त्रासाला कंटाळून ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीने शनिवारी, ६ रोजी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.