कालव्यात बुडून वृद्ध पतीपत्नीचा मृत्यू ! हरोली कालव्यातील घटना
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
म्हैसाळ योजनेच्या कालव्यात हरोली (ता. कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीत खरशिंगच्या पती-पत्नीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शा†नवारी (दि. 17) दुपारी एकच्या सुमारास घडली. दरम्यान वसंत तुकाराम पाटील (वय 80) व पमाबाई वसंत पाटील (वय 75, दोघेही रा. खरशिंग) असे बुडून मृत्यू झालेल्या वृद्धांचे नाव आहे. या घटनेची पा†लसात नोंद झाली आहे.
आ†धक मा†हती अशी, खरशिंग येथील वसंत तुकाराम पाटील व पमाबाई वसंत पाटील हे हरोली (ता.कवठेमहांकाळ) गावच्या हद्दीतील म्हैसाळ योजनेच्या कालव्यात शा†नवारी (दि. 17) दुपारी एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी आसपास शोधाशोध केली मात्र ते सापडले नाहीत.
नातेवाईक आणि ग्रामस्थ कालव्याजवळ गेले असता कालव्याच्या वरच्या बाजूला चप्पल व कपडे पडलेले दिसले. ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर हरोली गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 17) रात्री उा†शरा पमाताई पाटील यांचा मृतदेह कालव्यात आढळला. तर रा†ववारी (दि. 18) सकाळी बोरगावच्या हद्दीत वसंत पाटील यांचा एका वस्तीजवळून गेलेल्या म्हैसाळ कालव्यात मृतदेह आढळला. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. दरम्यान पती-पत्नीचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची गावात माहिती मिळतात गावातून हळहळ व्य‹ होत होती. या घटनेची नोंद पोलिसात झाली.