वृद्ध आजीचे डीपफेक तंत्रज्ञानामुळे झाले समाधान
नातवाने केले मनस्पर्शी काम
अनेकदा लोक स्वकीयांच्या मृत्यूला स्वीकारू शकत नाहीत. परंतु मृत व्यक्ती जिवंत होणे अशक्य आहे हे देखील तितकेच सत्य आहे. अशा स्थितीत अनेकदा कुणाच्या मृत्यूची खबर वृद्ध नातेवाईकांना दिली जात नाही कारण त्यांच्या कमजोर शरीरासाठी मोठा झटका प्रकृती बिघडण्याचे आणि मृत्यूचे कारण ठरू शकते.
चीनच्या लियोननिंग के सुन नावाच्या एका व्यक्तीने अशाचप्रकारे स्वत:च्या वडिलांच्या मृत्यूचे सत्य स्वत:च्या आजीपासून लपविले होते. सुन यांच्या वडिलांचा 6 महिन्यांपूर्वी कर्करोगामुळे मृत्यू झाला होत. सुन यांच्या 91 वर्षीय आजीला हृदयविकार होता आणि मुलाच्या मृत्यूचे वृत्त तिच्यासाठी धक्कादायक ठरू शकते अशी भीती सुन यांना सतावत होती. यामुळे सुनने आपले वडिल आजारी असून बीजिंगच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले होते.
परंतु आजी स्वत:च्या मुलाला पाहण्याचा हट्ट करू लागल्यावर सुनने स्वत:च्या वडिलांना ‘पुनर्जीवित’ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. वडिलांना रुग्णालयात मोबाइल बाळगण्याची अनुमती नाही. यामुळे आपण बीजिंगवरून एक व्हिडिओ रिकॉर्ड करुन आणल्याचे त्याने आजीला सांगितले.
जुनी छायाचित्रे आणि फेस-स्वॅप सॉफ्टवेअरचा वापर करत सुनने स्वत:च्या वडिलांचा चेहरा स्वत:च्या चेहऱ्यावर ठेवत त्यांच्या आवाजाची नक्कल केली. ‘आई मी बीजिंगमध्ये असून बरा आहे. येथे डॉक्टर या आजारावर उपचार करू शकत नाहीत. परंतु स्थिती नियंत्रणात आहे’ असे या व्हिडिओत तो म्हणताना दिसून येतो. हा व्हिडिओ स्वत:च्या आजीला दाखविण्यापूर्वी त्याची क्वालिटी चेक करण्यासाठी त्याने स्वत:च्या काकूला तो पाठविला होता. आजीचे दृष्टी कमजोर असली तरीही जीवनाबदद्ल तिचा दृष्टीकोन आशावादी आहे. हा व्हिडिओ पाहून त्यात आपलाच पुत्र असल्याचे तिने मानल्याचे सुन यांनी सांगितले आहे.
मला स्वत:ला देखील वडिलांचा मृत्यू स्वीकारणे अवघड वाटत होते. परंतु डीपफेकच्या मदतीने त्यांच्याप्रमाणे दिसणे देखील त्यांना निरोप देण्याची पद्धतच ठरल्याचे सुन सांगतो. याच्याशी निगडित व्हिडिओ सुनने सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याला 5 दशलक्ष ह्यूज मिळाल्या आहेत. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही सर्वोत्तम पद्धत असल्याचे एका युजरने नमूद केले आहे.