‘ओला’चे नवे सॉफ्टवेअर विश्वास अन् वेग जपण्यासाठी
नवी दिल्ली :
ओला कंपनी अॅथर, बजाज ऑटो, टीव्हीएस या सारख्या प्रतिस्पर्ध्यांना तोंड देण्यासाठी नवीन योजना आखत आहे. यामध्ये ग्राहकांना आपली वेगळ्या प्रकारची सेवा देण्यासाठी ओला कंपनी नवे सॉफ्टवेअर आणणार आहे. या संदर्भात ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टम सादर केली आहे. या नव्या सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतात वाढत्या ईव्ही बाजारातील आपली पकड अधिक मजबूत करण्यात येणार आहे. बेंगळूर येथील कंपनीने म्हटले आहे की, मूव्हओएस 5 आणि एस1 स्कूटर आणि नवीन रोडस्टर एक्स मोटरसायकली प्रदर्शनात सुधारणा करणार आहे.
नव्या सॉफ्टवेअरचा काय उद्देश :
नव्या योजनेचा फक्त अपडेट राहणार हा उद्देश नाही, तर विश्वास प्राप्त करणे आहे. स्मार्ट एनर्जीची रचना करणे आहे. तसेच विश्वास आणि राइड सेटिंगवर नियंत्रण प्राप्त करण्याचे काम करणार आहे. स्मार्ट रिजनेरेटिव्ह ब्रेकिंगच्या मदतीने बॅटरी आणि ऊर्जा प्राप्त करणार आहे.