महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माटवे दाबोळीतील पारंपरीक नाल्यातही वाहू लागले तेल तवंग,

01:14 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को : माटवे दाबोळीतील इंधन प्रदुषणाची समस्या अधिकच उग्र बनू लागली आहे. या भागातून वाहणाऱ्या पारंपरीक नाल्यातूनही पाण्याबरोबर तेल तवंग वाहू लागल्याने तो अडवून गोळा करण्याची धडपड सध्या सुरू झालेली आहे. काल पुन्हा एकदा या भागात शासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली. माटवे दाबोळीतील सर्वाधिक प्रदुषीत झालेल्या विहीरीतील पाणी उसपण्याचे काम गेले सात दिवस चालू आहे. मात्र, विहीरीत पुन्हा येणारे आणि इंधनाचे तवंग घेऊनच येते. इंधन वाहिनी गळती कुठे लागली आहे याचाही शोध अद्याप लागलेला नाही. त्यातच रविवारी सकाळी या गावातील पारंपरीक नाल्यातून येणारा इंधनाचा वास अधिकच उग्र बनला व तेल तवंगही दिसू लागले. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली. पुन्हा एकदा शासकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. झेडआयएव्ही कंपनीचे अधिकारी दाखल झाले. या पाहणीनंतर विहीरी पाठोपाठ आता नाल्यातून तेल तवंग बाहेर काढण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. काही कामगार तेल तवंग रोखून आणि गोळा करून ते बाहेर काढीत आहेत. गावातील प्रदुषण आणि लोकांमधील भिती वाढू लागलेली आहे. सात दिवस झाले तरी गावावरील धोका दूर होत नाही. इंधन झिरपणे असेच चालू राहिले तर परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य होणार नाही असे स्पष्ट करून स्थानिक पंच निलम नाईक यांनी गावाशेजारी अशी धोकादाय वाहिनीच नको अशी प्रतिक्रीया स्थानिक पंच निलमा नाईक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी माटवे गावाला या धोक्यापासून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

नऊशे मिटर अंतर खोदूनही इंधन वाहिनीची गळती सापडेना, तज्ञ पथकही दाखल

Advertisement

दरम्यान, ज्या झेडआयएव्ही इंधन कंपनीच्या झुआरीनगर भागातील तेल टाक्यांपर्यंत ही इंधन वाहिनी जाते त्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी शिवप्रसाद नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार विहीरीतील पाण्याचा उपसा चालू असतानाच नाल्यातही तेल तवंग व उग्र वास येत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे लगेच या कामासाठी नेमलेल्या कामगारांनी नाल्यातील पाण्याची पाहणी करून तेल तवंग काढण्यास सुरवात केली. हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. इंधन वाहिनीला कुठे गळती लागलेली आहे, याचा शोध घेण्याचे काम चालूच आहे. आतापर्यत नऊशे मिटर अंतराची वाहिनी खोदलेली आहे. परंतु गळती सापडलेली नाही. या गळतीचा शोध घेण्यासाठी विशेष तज्ञ पथकालाही गोव्यात आणण्यात आलेली असून त्यांनीही या कामाला सुरवात केलेली असल्याचे नायक म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article