कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑईल इंडियाचा नफा 18 टक्क्यांनी वधारला

06:22 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन प्रति बोनस समभाग : ऑईल इंडियाचे रिपोर्ट कार्ड

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफ्यात 18 टक्क्यांची प्रभावी वाढ नोंदवली आहे. ही वाढ प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे झाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की जानेवारी-मार्च 2024 साठी एकत्रित निव्वळ नफा 2,332.94 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 1,979.74 कोटी रुपये होता.

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू उत्पादक कंपनीने सांगितले की, तेलाच्या वाढीव किमतींमुळे त्यांची उलाढाल 16 टक्क्यांनी वाढून 10,375.09 कोटी रुपये झाली आहे.

विक्री महसूल वाढला

कच्च्या तेलाचे उत्पादन आणि विक्रीतून मिळणारा महसूल 18 टक्क्यांनी वाढला आहे. तथापि, कमी किमतींमुळे गॅसच्या महसुलात 16.5 टक्क्यांनी घट झाली आहे. 2023-24 च्या पूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 29 टक्क्यांनी घसरून 6,980.45 कोटी रुपयांवर आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article