कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेगाने कमी होत आहेत तेल-वायूचे साठे

06:45 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयईएचा इशारा, भारताला आहे धोका

Advertisement

जगात कच्चे तेल आणि वायूचे साठे वेगाने संपत चालले आहेत असा इशारा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) दिला आहे. ही स्थिती आयातीवर निर्भर भारतासारख्या देशांसाठी ऊर्जापुरवठा (पेट्रोल, डिझेल आणि गॅस) आणि किमतीप्रकरणी मोठा धोका निर्माण करत आहे. आयईएचा नवा अहवाल ‘तेल आणि गॅस क्षेत्रांमध्ये कमीचा प्रभाव’मध्ये भारताला ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध स्रोत, देशांतर्गत शोध आणि स्वच्छ ऊर्जा पर्यायांवर लक्ष द्यावे लागणार असल्याचे म्हटले गेले आहे.

Advertisement

भारतासाठी धोका

भारत स्वत:च्या गरजेच्या 85 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आणि 45 टक्के गॅस आयात करतो. वेगाने घटता जागतिक भांडार भारतासाठी पुरवठ्यात अडथळे आणि किमतीत वाढीचा धोका निर्माण करणार आहेत. खासकरून शेल आणि खोल समुद्री स्रोतांच्या जलद घटणाऱ्या प्रमाणामुळे हा धोका आणखी वाढत आहे. आयईएने भारताला स्वत:ची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.

 

तेल अन् गॅसचे साठे होत आहेत कमी

जगातील तेल आणि गॅसक्षेत्रांमधून उत्पादनाच्या नैसर्गिक कमतरतेचा दर वेगवान झाला आहे. याचे मोठे कारण आता तेल आणि गॅस उद्योग शेल आणि खोल समुद्री स्रोतांवर अधिक निर्भर आहे. जो पारंपरिक जमीन आधारित क्षेत्रांच्या तुलनेत लवकर संपून जातो. तेल आणि गॅसच्या कमतरतेचा दर ऊर्जा गुंतवणुकीसाठी सर्वात मोठा मुद्दा आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये हा दर वेगाने वाढला. उद्योगाला वर्तमान उत्पादन स्तर कायम राखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करावी लागत असल्याचे आयईएचे कार्यकारी संचालक फतीह बिरोल यांनी म्हटले.

तेल आणि गॅस उद्योगात दरवर्षी होणारी 90 टक्के गुंतवणूक केवळ वर्तमान क्षेत्रांची नैसर्गिक कमी रोखण्यास खर्च होतेय. नव्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी रक्कम शिल्लक राहते. जर नवी गुंतवणूक झाली नाही तर जागतिक तेल उत्पादन दरवर्षी 55 लाख बॅरल प्रतिदिन कमी होईल. जे 2010 मधील 40 लाख बॅरल प्रतिदिनाच्या तुलनेत खूपच अधिक आहे. याचप्रकारे नैसर्गिक वायूचे उत्पादन दरवर्षी 270 अब्ज घनमीटरने कमी होईल, जे 2010 मध्ये 180 बीसीएम होते. गुंतवणुकीशिवाय दरवर्षी ब्राझील आणि नॉर्वेच्या एकूण तेल उत्पादनाइतकी घट होणार असल्याचा इशारा बिरोल यांनी दिला.

शेल अ्न सागरी स्रोत

आयईएने जगातील सुमारे 15000 तेल आणि गॅस क्षेत्रांच्या डाटाचे विश्लेषण केले. यात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घटीच्या दरात मोठा फरक असल्याचे आढळून आले. युरोपमध्ये घट होण्याचा दर 15 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मध्यपूर्वेत जमीन आधारित क्षेत्रात घट होण्याचा दर वार्षिक 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. शेल ऑइल आणि वायूसाठे सर्वात वेगाने संपतात, पहिल्या वर्षात 35 टक्के आणि दुसऱ्या वर्षात 15 टक्क्यांनी उत्पादन कमी होते. सातत्याने ड्रिलिंग आणि गुंतवणूक न केल्यास पुरवठा कमी होऊ शकतो. 2050 पर्यंत वर्तमान उत्पादन कायम राखण्यासाठी 450 लाख बॅरल आणि 2000 अब्ज घनमीटर गॅस नव्या पारंपरिक क्षेत्रांमधून उपलब्ध व्हायला हवा.

नव्या प्रकल्पांना लागतो वेळ

नवे तेल आणि गॅस स्रोत विकसित करण्यास सरासरी 20 वर्षे लागतात. यात शोधासाठी 10 वर्षे आणि मूल्यांकन, मंजुरी आणि निर्मितीसाठी आणखी 10 वर्षे लागतात. गुंतवणूक किंवा शोधाला विलंब झाला तर 2030 आणि 2040 च्या दशकात पुरवठा कमी होऊ शकतो. यामुळे ऊर्जा सुरक्षा, किमतीत अस्थिरत आणि उत्सर्जनावर प्रभाव पडेल.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article