महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अरे...! कोण म्हणतयं येत नाय !

01:32 PM Nov 24, 2024 IST | Radhika Patil
Oh...! Who says you can't come!
Advertisement

कोल्हापूर : 
जिल्ह्यात गेल्या  तीन आठवड्यापासून सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची उत्कंठा शनिवारी मतमोजणीनंतर संपली. जिह्यातील 10 विधानसभा मतदार संघातील मतमोजणी सकाळी 8 वाजता झाली. पहिल्या अर्ध्यातासात पोस्टल मतदानाची मोजणी होताच कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली. यानंतर दर अर्ध्यातासाने जिह्यातील निकालाचा कल समोर येवू लागला. अकरा वाजता आमदारकीचा गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. महायुतीच्या सर्व उमेदवारांनी जिह्यात मुसंडी मारल्याने उत्साहात भर पडली.

Advertisement

जिह्यातील सर्व 10 विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. निकालाचा कल दुपारी साडेबारा वाजता स्पष्ट झाला. गळ्यात भगवा स्कार्फ आणि हातात भगवा झेंडा घेवून दुचाकरीवरुन विजयाचा जल्लोष करत तरुण फिरत होते. कोण म्हणतयं येत नाही, आल्याशिवाय रहात नाही, असा जयघोष करत फिरणारे कार्यकर्ते हे सर्वच मतदारसंघातील चित्र होते.

Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिह्यात महिन्याभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. दहा विधानसभा मतदार संघात 121 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राहिली. कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकर यांच्यात चुरस होती. पहिल्या सहा फेरीत राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली तर नंतरच्या फेरीत राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारली. सुरुवातीच्या काळात विजयाचा लंबक कधी इकडे तर कधी तिकडे फिरत रहिला. अखेर राजेश क्षीरसागर यांनी विजयाचा गुलाल उधळल्याचे स्पष्ट होताच, निकालाचा कल स्पष्ट होताच शनिवारपेठेसह शहरात राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

कोल्हापूर दक्षिणमध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात सामना झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमल महाडिक यांनी आघाडी घेतली. अमल महाडिक यांनी राखलेलं मताधिक्य अखेरपर्यंत कायम ठेवले. महाडीक यांच्या विजयाचा कल स्पष्ट होताच शिरोली, दक्षिणेतील गावासह महाडिक यांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला.
करवीर विधानसभा मतदार संघात चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील यांच्यात लढत झाली. मतमोजणीत पन्हाळा आणि करवीरच्या पूर्व-पश्चिम भागात चंद्रदीप नरके यांनी आघाडी घेतली. चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील यांच्यात लढत अखेरपर्यंत उत्कंठा वाढवणारी ठरली. पहिल्यापासून घेतलेली आघाडी चंद्रदीप नरके यांची कायम राहिली. मोठमोठ्या पैजांनी रंगतदार वाढवलेल्या करवीरच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी बाजी मारताच कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

इचलकरंजीच्या मतदारांनी मागील वेळीप्रमाणे पुन्हा आवाडे कुटुंबियांवर विश्वास टाकला. राहुल आवाडे यांना आमदार करुन इचलकरंजी हा काँग्रेसचा गड भाजपने आपल्याकडे खेचून आणला. राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी इचलकरंजी कडवी झुंज दिली. इचलकरंजी शहरात आवाडे समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. स्वाभिमानी संघटनेच्या पारंपरिक मतदारांनीही यड्रावकर यांना पसंदी दिली. परिणामी राजेंद्र पाटील यांची विधानसभेची वाट प्रशस्त झाली. शरद कारखाना परिसर आणि शिरोळ तालुक्यात गावात यड्रावकर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत आनंद साजरा केला.

शाहूवाडी पन्हाळ्यात जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांनी पुन्हा बाजी मारली. माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पराभावाचा धक्का सहन करावा लागला. विनय कोरे यांच्या विजयानंतर वारणा ख्रोयात समर्थकांनी गुलालाची उधळण केली. हातकणंगलेमध्ये आमदार राजूबाबा आवळे यांनी दुस्रयांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी हातकणंगलेत विजय मिळवला.

कागलच्या अतितटीच्या लढतीत आमदार हसन मुश्रीफ यांनी सहज विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून हसन मुश्रीफ यांनी मिळवलेली आघाडी कायम राहिली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कागल विधानसभा मतदार संघात हसन मुश्रीफ विजयी झाले. कागल, मुरगुडसह संपूर्ण कागलमध्ये मुश्रीफ समर्थकांनी तुफान जल्लोष केला. रात्री उशीरापर्यंत कागलमध्ये जल्लोषी वातावरण होते.

राधानगरी-भुदरगड मतदारसंघात  प्रतिष्ठतेच्या लढतीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी विजयाची हॅट्रीक केली. पहिल्यापासून आबिटकर यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. के. पी. पाटील यांना पराभावाचा सामना करावा लागला. गारगोटी शहरासह संपूर्ण मतदार संघात आबिटकर समर्थकांनी गुलालाची उधळण केली.

चंदगड  मतदारसंघात  अतितटीच्या लढतीत चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या नंदाताई बाभुळकर यांना निकराचा लढा दिला. आमदार राजेश पाटील हे तिस्रया स्थानावर राहिले. गटातटाच्या राजकारणात चंदगडकरांनी शिवाजी पाटील यांच्यावर विश्वास टाकल्याचे स्पष्ट होताच, समर्थकांनी जल्लोष केला.

 क्षीरसागरांचे  सकाळी नऊ वाजता विजयाचे फलक
कोल्हापूर उत्तरच्या अतितटीच्या लढतीमध्ये बाजी मारु असा आत्मविश्वास राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांना होता. शहरातील सर्वच महत्वाच्या चौकात सकाळी नऊ वाजताच पुन्हा एकदा राजेश... अशा आशयाची फलक कार्यकर्त्यांनी लावली होती. राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी विजयी होताच गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

उत्साही कार्यकर्त्यांना लगाम
पोलीसांनी संपूर्ण जिह्यासह करवीर, कागल, उत्तर आणि दक्षिण या संवेदनशील मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त तैणात केला होता. गाडीच्या पुंगळ्या काढून खुन्नस दाखवण्राया कार्यकर्त्यांना पोलीसांनी हिसका दाखवला. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळात जिह्यात निवडणूक निकालाचा दिवस शांततेत गेला. मात्र अनेक गावात असंतोषाची आग धगधगत असल्याने तणावपूर्ण वातावरण होते.

सोशल मिडीयावर जोर
सकाळी आठ वाजल्यापासून सोशल मिडीयावर निकालाचे अंदाज झळकत होते. मात्र जिह्यातील सर्वच लढती अतितटीच्या असल्याने उत्कंठा ताणली होती. आपल्या नेत्याला मिळालेल मताधिक्य अगर मतांची पिछाडी खरं आहे का ? याची विचारणा करुन खात्री केली जात होती. दोन चार फ्रेया झाल्यानंतर पुढील कोणत्या गावात कोण आघाडी घेईल, कोण पिछाडी घेईल याचे अंदाजही सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. समर्थकांनी आपल्या विजयी उमेदवाराची छबी आणि जोषपूर्ण गाण्यांचे . व्हिडीओ स्टेटस् ला ठेवत आपले मत कसे योग्य होते दाखवून दिले.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article