हॅरिस उमेदवारीस अधिकृत मान्यता
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या विद्यमान उपाध्यक्षा आणि डेमॉव्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीस डेमॉव्रेटिक पक्षाने अधिकृत मान्यता दिली आहे. शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घोषित केला. अध्यक्षपदासाठीच्या पक्षाच्या उमेदवार म्हणून 400 ज्येष्ठ नेत्यांच्या समूहाने बहुमताने त्यांची निवड केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला अधिकृत म्हणून घोषित करण्यात आले आहे. विद्यमान अध्यक्ष बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने हॅरिस यांना ही संधी मिळाली आहे. त्यांना डेमॉव्रेटिक पक्षातून काही नेत्यांनी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, या पक्षाच्या बहुसंख्य मतदारांनी त्यांच्याच उमेदवारीची मागणी केल्याने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यांचीच निवड होणार हे जवळपास निश्चित होते. त्यानुसार आता निवड झाली असून त्या जोरदार प्रचारासाठी सज्ज होत आहेत.