For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान

06:46 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान
Advertisement

- शिंदे सेनेच्या आमदाराच्या वक्तव्याने वादाला तोंड

Advertisement

 प्रतिनिधी/ मुंबई

एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला मी 11 लाख रुपये देईन, असे त्यांनी जाहीर आवाहनच केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वक्तव्यावरुन सध्या नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

Advertisement

आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल गांधी यांचे वक्तव्य हा जनतेचा मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी संविधानाचं पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असं खोटं नरेटिव्ह पसरवतात. पण प्रत्यक्षात देशाला 400 वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. मराठा, धनगर आणि ओबीसीसारखे समाज  आरक्षणासाठी लढत आहेत, पण ते देण्याऐवजी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत, असे गायकवाड म्हणाले.

गायकवाड यांच्यावर टीका

या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. संजय गायकवाड यांच वक्तव्य मूर्खपणाचे आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. येत्या काळात महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असेही ते म्हणाले.

भाजप अलिप्त

संजय गायकवाड यांच्या वक्तव्यापासून भाजपने स्वत:ला लांब ठेवले आहे. या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे प्रवक्ते संजय गायकवाड यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील काँग्रेस नेते प्रचंड भडकले आहेत. यात विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावर ट्विट करत विधिमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याची वफत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्यांची वफत्ती एकच आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे. ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही.

Advertisement
Tags :

.