कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑफ-बिट : ‘नंबर 4’चे दावेदार...

06:00 AM May 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विराट कोहली निवृत्त झालाय अन् त्यामुळं कसोटीतील भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीतील त्याचं चौथं स्थान खाली झालंय...ते भरून काढणं हे सोपं आव्हान नसून त्यादृष्टीनं वेळीच हालचाली करण्याची निकड उभी झालीय ती भारताच्या इंग्लंड दौऱ्याला फक्त एक महिना बाकी असल्यानं. या स्थानासाठी काही दमदार युवा फलंदाजांचे पर्याय उपलब्ध असून त्या दावेदारांवर टाकलेली ही नजर...

Advertisement

सर्फराज खान

Advertisement

घरगुती क्रिकेटमधील शानदार कामगिरीनंतर सर्फराजला 2024 मध्ये राजकोट इथं इंग्लंडविऊद्ध कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्यावेळीही संघात विराट नव्हता. या 27 वर्षीय खेळाडूनं त्याच वर्षी न्यूझीलंडविऊद्ध पहिलं कसोटी शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेदरम्यान त्याला बाहेर बसावं लागलेलं असलं अन् आतापर्यंत फक्त सहा कसोटी सामने तो खेळलेला असला, तरी चौथ्या क्रमांकासाठीचा एक मजबूत दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल.

के. एल. राहुल

अलीकडच्या काळात संकटाच्या वेळी भारताच्या मदतीला सतत धावून आलेल्या राहुलनं संघाच्या गरजांनुसार वरच्या आणि मधल्या फळीमध्ये फलंदाजी केलीय. संघातील सर्वोत्तम फलंदाजानं निरोप घेतलेला असल्यानं भक्कम तंत्रासाठी ओळखला जाणारा राहुल चौथ्या क्रमांकासाठीचा एक स्वाभाविक पर्याय ठरू शकतो...

शुभमन गिल

भारतीय कसोटी फलंदाजीचं भविष्य म्हणून बऱ्याच काळापासून गिलकडे पाहिलं जातंय. 25 वर्षांचा असताना 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यापासून तो 32 कसोटी सामने खेळलाय. जरी तो बहुतेक वेळा वरच्या क्रमांकावर किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आला असला, तरी गिलची फटकेबाजीची क्षमता त्याला चौथ्या क्रमांकासाठी एक समर्थ दावेदार बनवते. या स्थानावर खेळणं त्याच्या कसोटी कारकिर्दीला उंचावण्याच्या दृष्टीनं आवश्यक चालना देखील देऊ शकतं...

साई सुदर्शन

या यादीतील असा एकमेव खेळाडू ज्यानं अद्याप भारताच्या कसेटी संघात पाऊल ठेवलेलं नाही. मात्र तो भविष्यात भारतातर्फे क्रिकेटच्या सर्व स्वरुपांत खेळू शकणारा खेळाडू म्हणून स्वत:ला प्रस्थापित करू लागलाय. या डावखुऱ्या फलंदाजानं 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यांत आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं, परंतु त्यानंतर तो फक्त चार आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. तथापि, गेल्या वर्षीच्या अखेरीस भारत ‘अ’ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेली दमदार कामगिरी आणि ‘आयपीएल’चा यंदाचा गाजविलेला हंगाम यामुळं निवड समितीला इंग्लंडविऊद्धच्या आगामी मालिकेत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळविण्याचा मोह होऊ शकतो...

श्रेयस अय्यर

विराटच्या निवृत्तीचा फायदा श्रेयसला होऊ शकतो. या उजव्या हाताच्या फलंदाजानं 2021 मध्ये न्यूझीलंडविऊद्ध शतक झळकावून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुऊवात केली होती. परंतु आतापर्यंत तो फक्त 14 कसोटी सामने खेळलाय. संघ व्यवस्थापन इंग्लंडविऊद्धच्या संपूर्ण मालिकेत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळविण्याचा प्रयोग करून पाहू शकतं. श्रेयस अय्यरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला चौथा क्रमांक पक्का केलाय...

करुण नायर

देशांतर्गत क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरीनंतर कऊण भारतीय संघात पुनरागमनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. त्याच्या दुर्दैवानं त्रिशतक झळकावल्यानंतरही त्याला मोठी संधी मिळाली नाही आणि 2017 मध्ये बांगलादेशविऊद्धच्या पुढच्याच कसोटी सामन्यासाठी त्याला वगळण्यात आलं. जरी त्यानंतर त्यानं पुनरागमन केलं असलं, तरी त्याला आवश्यक पाठिंबा मिळाला नाही. 2018 साली इंग्लंडविऊद्ध एकही कसोटी खेळू न देता त्याला वगळण्यात आलं. विराटच्या निवृत्तीमुळं त्याच्यासाठी चौथ्या क्रमांकाची दारं उघडू शकतात...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article