महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमला हॅरिस यांना ओबामांचा पाठिंबा

06:40 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी 1 ऑगस्टला मतदान

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे. या दोघांनी शुक्रवारी कमला हॅरिस यांना फोनवरून ही माहिती दिली. बराक ओबामा यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये बराक आणि मिशेल कमला हॅरिसना पाठिंबा देण्याबाबत बोलताना दिसत आहेत. यानंतर कमला हॅरिस आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आता डेमोक्रॅटिक पक्षात अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्यासाठी 1 ऑगस्टला मतदान होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमला यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

जो बिडेन यांनी 22 जुलै रोजी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव पुढे आले आहे. सद्यस्थितीत कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी होण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या आवश्यक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवल्याचे बोलले जात आहे. तसेच आता माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनीही बिडेन यांच्या माघारीनंतर 4 दिवसांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे.

कमला हॅरिससाठी सर्वतोपरी प्रयत्न करू!

बराक ओबामा यांनी कमला यांना पाठिंबा देत त्यांना जिंकण्यासाठी आणि व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्युत्तरात कमला हॅरिस यांनी ओबामा दाम्पत्याचे आभार मानले आणि त्यांच्या अनेक दशकांच्या मैत्रीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article