For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनव्हिडीया जगातील सर्वात मौल्यवान कंपनी

06:12 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
एनव्हिडीया जगातील सर्वात मौल्यवान कंपनी
Advertisement

मायक्रोसॉफ्टला मागे टाकत पटकावले स्थान : बाजारमूल्य 3.34 ट्रिलियनच्या घरात 

Advertisement

कॅलिफोर्निया :

अमेरिकेतील सेमीकंडक्टर चिप निर्मिती कंपनी एनव्हिडीया मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. एनव्हिडीया कॉर्पचा स्टॉक 4.60 डॉलरच्या म्हणजे 3.51 टक्क्यांच्या वाढीसह मंगळवारी 18 जून रोजी 11,300 रुपयांवर बंद झाला आहे.

Advertisement

स्टॉकमधील या वाढीसह, कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 278 लाख कोटी रुपये वर पोहोचले आहे. त्याचवेळी, मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य सुमारे 276 लाख कोटी रुपये आहे. मंगळवारी, मायक्रोसॉफ्टचा स्टॉक 0.45 टक्क्याच्या घसरणीसह 446.34 डॉलरवर बंद झाला.

आयफोन निर्माता अॅपलच्या बाजारमूल्यासंदर्भात पाहिल्यास यामध्ये सुमारे 274 लाख कोटी रुपये इतके आहे. मंगळवारी, अॅपलचा स्टॉक 1.10 टक्केच्या घसरणीसह 214.29 डॉलरवर बंद झाला. 5 जून रोजी, एनव्हिडीया अॅपलला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती.

निर्मितीतले शिल्पकार

कंपनी जीपीयु डिझाइन आणि निर्मिती करते. एनव्हिडीया ही एक तंत्रज्ञान कंपनी आहे जी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सच्या डिझाइन आणि निर्मितीसाठी ओळखली जाते. याची स्थापना 1993 मध्ये जेन्सेन हुआंग, कर्टिस प्रीम आणि ख्रिस मालाचोव्स्की यांनी केली होती. याचे मुख्यालय सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे आहे.

कंपनीचे कार्य

एनव्हिडीया गेमिंग, क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि व्यावसायिक उपयोगांसाठी चिप्स डिझाइन तयार करते. यासोबतच यांची चिप प्रणाली ही वाहने, रोबोटिक्स आणि इतर उपकरणांमध्येही वापरली जाते. अॅपलला या वर्षी आव्हानांचा सामना करावा लागला आहे, चीनमधील आयफोनची घटती मागणी आणि युरोपियन युनियनकडून दंडाच्या चिंतेमुळे त्यांचे शेअर्स दबावाखाली आले आहेत.

Advertisement
Tags :

.