कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

थ्रिलरपटात दिसून येणार नुसरत भरुचा

06:01 AM Mar 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनुराग कश्यपसोबत करणार काम

Advertisement

नुसरत भरुचा आता एका थ्रिलर चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा करणार आहे. तर अनुराग कश्यपने यात कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. हा चित्रपट एक बकेट लिस्ट टिक आहे. अनुरागसोबत काम करणे म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. या मनोरंजक थ्रिलर चित्रपटात प्रेक्षकांना काहीतरी वेगळे पहायला मिळणार असल्याचे नुसरत म्हणाली.

Advertisement

या चित्रपटासाठी विशाल राणा आणि लेखक-दिग्दर्शक अक्षत अजय शर्मासोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.  तीन दिग्गजांसोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे, पहिला नेहमीच सर्वात जादुई असतो असे नुसरतने म्हटले आहे. नुसरत एक उत्तम अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करण्याची संधी मला यापूर्वी मिळाली नव्हती. तीन वर्षांच्या कालावधीनंतर विशाल राणा आणि अक्षत अजय वर्मासोबत काम करत आहे. चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असल्याचे अनुरागने म्हटले आहे. चित्रपटाची कहाणी अत्यंत वेगळी असेल. हा विशाल, नुसरत आणि अनुरागसोबत काम करत एक दूरदर्शी चित्रपट असेल असा दावा दिग्दर्शक अक्षतने केला आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article