परिचारिका अर्चना सकपाळ यांचे निधन
सावंतवाडी
मुंबई येथील जे जे रुग्णालयाच्या वरिष्ठ परिचारिका अर्चना अंकुश सकपाळ (विजया शंभा भगत) (५३) यांचे सोमवारी सकाळी मुंबई.. घाटकोपर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अल्पशा आजाराने निधन झाले. सातोसे (ता.सावंतवाडी) च्या सुकन्या असलेल्या अर्चना उर्फ विजया भगत शालेय हुषार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होत्या. सातर्डा महात्मा गांधी हायस्कूल मधून त्या १९८७ मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. शिरोडा कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण करुन परिचारिका पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता गेली ३० वर्षे जे जे रुग्णालयात परिचारिका म्हणुन त्या कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, भाऊ, बहिणी, भावजया, भावोजी असा मोठा परिवार आहे. सातोसे चे माजी सरपंच एकनाथ भगत व मुंबई महापालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक विष्णू भगत यांच्या त्या बहीण होत.