‘नूरानी चेहरा’मध्ये नुपूर सेनॉन
स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न
अभिनेत्री क्रीति सेनॉनची बहिण नुपूरने अभिनयाच्या क्षेत्रात तेलगू चित्रपट टायगर नागेश्वर राव द्वारे पाऊल ठेवले होते. नुपूर आता स्वत:चा पहिला हिंदी चित्रपट ‘नूरानी चेहरा’वरून अत्यंत उत्सुक आहे. या चित्रपटात तिने नवाजुद्दीन सिद्दीकी, सोनाली सहगल आणि जस्सी गिल यासारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात माझी एक अत्यंत सशक्त आणि प्रभावशाली भूमिका आहे. या चित्रपटात मला सर्वकाही करण्याची संधी मिळाली आहे. यात मी रडले, हसले, ओरडले आणि प्रेम देखील केले आहे.
कॅमेऱ्यासोबत सर्व भावना व्यक्त करण्याची मला संधी मिळाली आहे. नवाजुद्दीन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. हा चित्रपट लवकरात लवकर लोकांसमोर यावा इतकीच मी अपेक्षा करत आहे. चित्रपटाचे सध्या निर्मित्तीनंतरचे काम सुरू असल्याचे नुपूरने म्हटले आहे. नुपूर ही अभिनेता अक्षय कुमारसोबत एका म्युझिक व्हिडिओत काम केल्यावर सर्वप्रथम चर्चेत आली होती. नुपूर पुढील काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.